एक्स्प्लोर

ठाकरे-पवार पॅटर्न ठरणार भाजपला आव्हान, भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडेंचा सतर्कतेचा इशारा

संजय काकडेंच्या मते युतीचा हा नवा पॅटर्न भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकतो. त्यामुळे भाजपने वेळीच सतर्क होणं गरजेचं असल्याचा सल्लाही काकडे यांनी भाजपला दिलेला आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस वारंवार चव्हाट्यावर येत आहे. कधी नियुक्त्या, तर कधी बदल्या, तर कधी निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेतल्यामुळे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे. मात्र असं असलं तरी राज्याच्या राजकारणात ठाकरे - पवार पॅटर्न हा नवा प्रयोग उदयास येत असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-राष्ट्रवादीने मोट बांधल्याचा दावा भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस या तोडग्याला तयार होईल असा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका विश्वसनीय व्यक्तीकडून त्यांना याची माहिती मिळाल्याचं त्यांनी कबूल केलं.

संजय काकडे यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. काकडेंच्या मते युतीचा हा नवा पॅटर्न भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकतो. त्यामुळे भाजपने वेळीच सतर्क होणं गरजेचं असल्याचा सल्लाही काकडे यांनी भाजपला दिलेला आहे. इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 17, राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि काँग्रेस 15 असं जागावाटपाचं सूत्र ठरत असल्याची चर्चाही झाल्याचा त्यांनी खुलासा केला.

संजय काकडे यांच्या मते महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर करणे आणि पक्षांतर करण्याच्या तयारीत असलेल्या काठावरच्या आमदारांना सूचक इशारा देण्यासाठी या नव्या राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे. यामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना बळकटी देऊन भाजपचा सफाया करण्याची रणनीती आखली जाण्याची तयारी आहे.

खरंतर संजय काकडे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार झाले. यंदा 2014 च्या निवडणुकीत काकडे पुन्हा भाजप सोडून घरवापसी करण्याच्या मार्गावर होते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी निर्णय बदलला. यापूर्वीही संजय काकडे त्यांच्या खळबळजनक दाव्यांसाठी अनेकदा चर्चेत राहिलेत. मात्र त्यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याने ते कायम अशी वक्तव्य करत असतात.

दरम्यान, मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चा असल्या तरी हे सरकार पडणार नाही असं भाकीत संजय काकडे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे संयमी नेतृत्व असल्याने सरकार टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Maha vikas Aghadi | थोडी काळजी घेतली तर महाविकास आघाडी भक्कम होईल : बाळासाहेब थोरात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह उपनगरात पहाटे जोरदार पाऊस; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
Maharashtra Live News Updates: मुंबईसह उपनगरात पहाटे जोरदार पाऊस; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
Laxman Hake: सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी, मनोज जरांगेंचं उपोषण पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठीच; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके संतापले, सरकारवर सडकून टीका
सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी, मनोज जरांगेंचं उपोषण पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठीच; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके संतापले, सरकारवर सडकून टीका
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
Embed widget