जालना : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मित्र पक्षांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारवर केली आहे. कर्तबगार निष्ठावंत आमदारांना ठाकरे सरकारने डावललं आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराने पोळा फुटून सरकार कोसळेल, असा दावाही लोणीकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी या सर्व नेत्यांचा विसर या सरकारला पडला आहे. या नेत्यांच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत मतं घेतली. त्यानंतर या नेत्यांना मंत्रिपद तर दिलं नाहीच, शिवाय मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यालाही आणि बैठकीलाही बोलावलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मित्र पक्षांचा विश्वासघात केला. हे विश्वासघातकी मंत्रिमंडळ आहे, अशी टीका बबनराव लोणीकर यांनी केली.
महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आज नाराज झाले आहेत. शिवाय त्यांच्याच पक्षातील काही आमदारही नाराज आहेत. तिन्ही पक्षांनी निष्ठावंत आणि कर्तबगार आमदारांनाही डावललं आहे. आपल्या पक्षातील लोकांना नाराज करुन काही मोजक्या लोकांना मंत्रिमंडळात संधी दिली गेल्याचा आरोप लोणीकरांनी केला आहे. हे सर्व नाराज नेते तिन्ही पक्षांपासून दूर जातील आणि हे सरकार पडेल, असा अंदाज बबनराव लोणीकरांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या 36 मंत्र्यांनी काल शपथ घेतली. शिवसेनेकडून 12, राष्ट्रवादीकडून 14 आणि काँग्रेसकडून 10 मंत्र्यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. अजित पवारांनी दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मंत्र्यांची यादी
शिवसेनेचे मंत्री
आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)
काँग्रेसचे मंत्री
के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार (नागपूर)
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)
राष्ट्रवादीचे मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख (नागपूर)
डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा)
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक (मुंबई)
बाळासाहेब पाटील (कराड, सातारा)
राजेश टोपे (अंबड, जालना)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)
संबंधित बातम्या
महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांकडून शपथ
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी नाही; 43 पैकी केवळ तीनच महिला मंत्री
शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजीचा सूर, शिवसनेचे राऊत, सावंत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पक्षावर नराज?