मालेगाव : नागरिकत्व कायद्याचा विषय सुरु होताच मालेगाव मधील सुमारे 50 हजारापेक्षा जास्त नागरीकांनी जन्म-मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल केले आहेत. या कायद्याचा मालेगाव मधील मुस्लीम बांधवांनी चांगलाच धसका घेतल्याचे पहावयास मिळाले आहे.
नागरिकत्वाच्या विषयावर विधानसभा निवडणुकीपुर्वीची चर्चा होऊ लागल्याने मालेगाव मधील मुस्लीम बांधवांनी धास्ती घेतली. केंद्र सरकारने आसाम मध्ये लागू केलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे मालेगाव मधील मुस्लीम बांधवांनी धसका घेत 2009 पासून जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखल काढण्यास सुरुवात केली आहे. मागील महिन्यापासून मालेगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात दाखले काढण्यासाठी महिलांसह, पुरुषांची मोठी गर्दी होत असल्याचे दृश्य गेल्या दोन महिन्यांपासून पहायला मिळत आहे.
एनआरसीची संपूर्ण देशात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा चांगला धसका मालेगाव येथील नागरिकांनी घेतला आहे. मालेगाव शहराच्या पुर्व भागात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान वारे फिरल्याने त्याचे मोठे पडसाद उमटले आणि तेव्हा पासून डिसेंबर अखेरपर्यंत पन्नास हजारापेक्षा जास्त नागरीकांनी जन्म-मृत्यूच्या नोंदणी अर्जासाठी मालेगाव महापालिकेत नोंदणी केली. यंत्रमागाच्या या शहरात अनेक लोक पिढ्यांपिढ्या येथे राहत आहे. त्यांच्या शासकीय स्तरावर नोंदी असल्यातरी एनआरसी कायदा लागू झालाच तर अडचण नको म्हणून त्यासाठी अगोदरच तजवीज करुन ठेवावी यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात रोजच गर्दी पाहायला मिळत आहे.
सहा महिन्यांपूर्वीच मुस्लिम नागरीकांनी दाखल्यांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. त्याचा आकडा सत्तर हजाराच्या आसपास गेला आहे. मात्र चार महिन्यात पन्नास हजारावर नागरिकांनी एनआरसीच्या धसका घेत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर दाखले येत असल्याचं मनपा आयुक्तांनी म्हटले आहे. एकूणच केवळ जन्म-मृत्यूच नाही तर आधार कार्ड मध्ये नावांच्या झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी रांगा लागत आहे.
जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी गर्दी, चार महिन्यात पन्नास हजारापेक्षा जास्त अर्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2019 10:16 PM (IST)
नागरिकत्वाच्या विषयावर विधानसभा निवडणुकीपुर्वीची चर्चा होऊ लागल्याने मालेगाव मधील मुस्लीम बांधवांनी धास्ती घेतली. केंद्र सरकारने आसाम मध्ये लागू केलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे मालेगाव मधील मुस्लीम बांधवांनी धसका घेत 2009 पासून जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखल काढण्यास सुरुवात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -