Maharashtra Politics नागपूर : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) अश्वरूप पुतळ्यांचे ते आज अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांचा मुक्काम नागपुरातील हॉटेल रेडिसन येथे आहे. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी सलील देशमुख पोहचले आहे. 


अनिल देशमुख हे काटोल विधानसभा सोडायला तयार नसल्याने सलील देखमुख हे पर्यायी मतदार संघाच्या शोधात आहे . त्यामुळे सलील देशमुख यांच्या पर्यायी मतदारसंघाला घेऊन नागपूर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. परिणामी, त्या पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांची उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली भेट महत्वाची मनाली जात आहे.


पूर्व विदर्भातील 28 विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना ठाकरे गटाकडून आढावा


उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. दरम्यान, पूर्व विदर्भातील 28 विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना ठाकरे गटाकडून आढावा घेतला आणि त्यातील 8 ते 10 जागांची आमची मागणी असल्याचे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. यात नागपूर जिल्हात 5 जागेवर उबाठाचा दावा केला असून रामटेक, कामठी, उमरेड आणि शहरातील नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्वची मागणी आम्ही करणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे या जागांवर अंतिम निर्णय आज उद्धव ठाकरे घेणार असल्याची शक्यता आहे. 


रामटेक विधासभेच्या जागेवरुन दोन गाटात नारेबाजी 


दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधासभेच्या जागेवरुन करण्यात आलेल्या दाव्याला घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन गटाची समोरासमोर नारेबाजी झाल्याचे बघायला मिळाले आहे. विशाल बरबटे आणि माजी खासदार प्रकाश जाधव या दोन्ही नेत्यांनी रामटेक विधासभेच्या जागेची पक्षाकडे मागणी केली आहे. मात्र यावर अंतिम निर्णय व्हायचा असला तरी कार्यकर्ते आपल्या नेत्याला तिकीट मिळावी यासाठी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आज भास्कर जाधव यांनी नागपुरातील रवी भवन येथे आढावा बैठक ठेवली होती. तेव्हा हे दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर आपापल्या नेत्याच्या विजयाचा जयघोष कार्यकत्यांनी केला. त्यामुळे काही क्षणासाठी वातावरण गंभीर झाले होते.   


हे ही वाचा