मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे प्रशासकीय अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi ) पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर आज झालेल्या बैठकीत प्रवीण परदेशी सहभागी झाले होते.
प्रवीण परदेशी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. परंतु, ठाकरे सरकार सत्तेवर येताच प्रवीण परदेशी यांची आयुक्त पदावरून मे 2020 मध्ये बदली करण्यात आली होती. त्यानंतर परदेशी थेट केंद्रीय कमिट्यांमध्ये सक्रीय होते. 2021 मध्ये प्रवीण परदेशी केद्रीय कमिटीतून निवृत्त झाले. त्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर आज झालेल्या बैठकीत ते सहभागी झाले होते. परदेशी यांच्या एन्ट्रीने सर्वच आश्चर्यचकीत झाले.
कोण आहेत प्रवीण परदेशी?
प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास, महसूलसह अनेक महत्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता त्यावेळी परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. भूकंप झाला त्यावेळी परदेशी यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवलेल्या धाडसाचे त्यावेळी खास कौतुक करण्यात आले होते. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच परदेशी यांना मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्त केले होते. त्यानंतर प्रवीण परदेशी यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच 2020 मध्ये प्रवीण परदेशी यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
प्रवीण परदेशी यांना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाते. त्यामुळेच आता पुन्हा शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच प्रवीण परदेशी अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या