एक्स्प्लोर

Ashok Chavan : माझा 'विनायक मेटे' करण्याचा डाव; अशोक चव्हाण यांचा खळबळजनक आरोप 

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपला घातपात घडवण्याची भीती व्यक्त केली आहे. या संदर्भात अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली आहे. 

नांदेड  : "माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील कारेगांव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी हा गंभीर आरोप केलाय. 

आपला घातपात घडवण्याची भीती अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या संदर्भात आज दुपारी अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली आहे. 

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, " आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाच्या कार्यकाळात काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील स्वाक्षरी कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. याची कुणकुण अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेड देखील मिळाले होते.

यानंतर अशोक चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांच्या तक्रारीनंतर  31 जानेवारीपासून या प्रकरणी पोलीस चौकशीदेखील सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.   

माझ्यावर पाळत ठेवली जात आहे...

"आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात असून, तो व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करत आहे. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असल्याचा अंदाज चव्हाण यांनी वर्तवला आहे.  तसेच बनावट पत्रे तयार करून विविध समाजात बदनामी करून, सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.  

पाहा व्हिडीओ 

 महत्वाच्या बातम्या

Ashok Chavan: मंत्रीपदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे; घातपात घडवण्याचा संशय 

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...

Embed widget