एक्स्प्लोर

अश्विनी बिद्रे हत्या : वस्तूंची पुन्हा फॉरेन्सिक तपासणी करणार

अश्विनी बिद्रे यांच्या लहान मुलीच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.

कोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासातील वस्तूंची पुन्हा खासगी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील अंधेरी येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी शासकीय फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली होती. मात्र तपासणीत सर्व पुराव्यांची तपासणी निगेटिव्ह आल्याने पुन्हा खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, तपासणीसाठी अश्विनी बिद्रे यांच्या लहान मुलीच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात येणार आहेत. नेमकं काय प्रकरण आहे? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून  वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. अश्विनी जयकुमार बिद्रे... कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी. त्या 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं. अश्विनी बिद्रे हत्या : वस्तूंची पुन्हा फॉरेन्सिक तपासणी करणार पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं. अश्विनी आणि अभय यांच्यात वाद अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदकरने भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर तात्काळ रजेवर गेला. दरम्यान, अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime News: 'व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर...'; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
'व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर...'; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
CET Exam Audio : विद्यार्थ्यांना स्वतःच्या मर्जीने परीक्षा केंद्र निवडता येते का? बोर्डात 40 ते 50 टक्के अन् सीईटी 90 ते 100 टक्के कसे? व्हायरल ऑडिओ क्लिपसह सर्व प्रश्नांवर सीईटी सेलच्या आयुक्तांनी दिली माहिती
विद्यार्थ्यांना स्वतःच्या मर्जीने परीक्षा केंद्र निवडता येते का? बोर्डात 40 ते 50 टक्के अन् सीईटी 90 ते 100 टक्के कसे? व्हायरल ऑडिओ क्लिपसह सर्व प्रश्नांवर सीईटी सेलच्या आयुक्तांनी दिली माहिती
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Girish Mahajan: 'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा
'वयाचा विचार करता आम्ही आता किती दिवस काम करणार...'; गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत? 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Embed widget