एक्स्प्लोर

राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी, राज्य सरकारचा निर्णय

चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून तातडीने अदा करावेत. त्यात विलंब करू नये. ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे, त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

मुंबई  : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरु करण्याचा निर्णय मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करु नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देश देखील पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, छावण्यांमधील जनावरांच्या सोयीसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. अशावेळी महिलांसाठी त्याठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. चारा छावण्यांची बिले जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी तपासून तातडीने अदा करावेत. त्यात विलंब करू नये. ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे, त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी आता पर्यंत 34 लाख शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पाटील म्हणाले की, राज्यात सध्या 6209 टॅंकर्सच्या माध्यमातून 4920 गावे आणि 10 हजार 506 पाड्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण 1501 चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे 10 लाख 4 हाजर 684 जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना 111 कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना 47 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra DGIPR: व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा; शासनाकडून व्यवसायिकांना महत्वपूर्ण आवाहन
व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा; शासनाकडून व्यवसायिकांना महत्वपूर्ण आवाहन
Gas Shortage: गॅस टंचाईवर मोदी सरकारचे महत्वाचे आदेश, महाराष्ट्रासह देशभरात सध्या परिस्थिती काय, कुठे कुठे गॅसची कपात?, A टू Z माहिती
गॅस टंचाईवर मोदी सरकारचे महत्वाचे आदेश, महाराष्ट्रासह देशभरात सध्या परिस्थिती काय, कुठे कुठे गॅसची कपात?, A टू Z माहिती
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
Embed widget