Maharashtra Buldana News : शेगाव ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पूर्णा नदी पात्रात रेती उपसा करणाऱ्यांनी खोदून ठेवलेल्या खड्डयात बुडून एका 12 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवैधपणे रेती उपसा करून मुलाच्या मृत्यू कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात ठिय्या दिला. या प्रकरणी पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत.
काल (मंगळवार) शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती. त्याच परिसरात आज पुरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यानी रातोरात जेसीबीच्या साहाय्याने खोदून ठेवलेल्या खड्डयात बुडून एका बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शेगाव पोलीस स्थानकात चांगलाच हंगामा केला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की, काल सायंकाळी वाळू तस्करांनी तहसीलदांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती. आज त्याच परिसरात पूर्णा नदी पात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदीपात्रात मोठा खड्डा खोदला आणि त्यातील वाळू चोरून नेली. काल (मंगळवारी) दुपारी नेहमीप्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंनगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या खड्ड्यात बुडून अर्जुन भारसाकळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याची तक्रार पोलिसांत देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यानं नागरिकांनी आणि नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरच पोलीस प्रशासन हाय हायचे नारे देत मोठा गोंधळ घातला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्विकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. अजुनही हा गोंधळ सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कारखान्यावरील मुकादमाचं अपहरण करुन 12 लाखांची मागणी, पैसे न दिल्याने खून; बीडमधील धक्कादायक घटना
- Pune: दहावीच्या विद्यार्थीनीवर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
- Sangli Crime : आटपाडी तहसीलदाराच्या शासकीय वाहनावर डम्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha