Flood:  लातूर : मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्नाटक बॉर्डरजवळ असलेल्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामध्ये, लातूरमधील अनेक घरांचे व शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूरही आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, कर्नाटक पाटबंधाकेर विभागाची चूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोवल्याचं आता समोर आलं आहे. पावसाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला असून प्रार्थमिक अंदाजानुसार साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून औराद शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठ नुकसान झालं आहे.


मांजरा नदी लातूर जिल्ह्यात 145 किलोमीटर चा प्रवास करते. जिल्ह्यात रेणा, तेरणा यांसारख्या नद्या मांजरा नदीला येऊन मिळतात. औराद शहाजानीच्या बाजूला तेरणा नदी मांजरला मिळते, संगम जिथे होतो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असते. मात्र, यावर्षी त्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मांजरा आणि तेरणाचा संगम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर मांजरा नदीवर कर्नाटकात कोगळी येथे बॅरेजेस बांधण्यात आले आहेत, कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून कर्नाटकात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बॅरेजचे दोनच दरवाजे उघडण्यात आले. याचा थेट परिणाम मांजरा नदीच्या बॅक वॉटरच्या रूपाने झाला. त्यामुळे, औराद शहाजानी शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. कर्नाटक पाटबंधारे विभागाने केलेल्या या चुकीमुळे मोठा फटका शेतातील मूग उडीद सोयाबीन यांसारख्या पिकांना बसला आहे. 


मुग, उडीद व सोयाबिनसारखी पिके पाण्याखाली


पावसाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला असून प्रार्थमिक अंदाजानुसार साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून औराद शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठ नुकसान झालं आहे. येथील 32 मंडळात अतीवृष्टी झाल्याने अगोदरच अतोनात नुकसानीला तोंड द्यावं लागत आहे. या अतिवृष्टीमुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, रेणा, मन्याड आणि तीरू यांसारख्या नद्या भरून वाहत होत्या. या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये आल्याकारणाने मोठा परिणाम शेतीवर झाला आहे. मुग, उडीद सोयाबीनसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. काढणीला आलेलं मूग आणि उडीद प्रभावित झालं आहे. औराद शहाजानी सारख्या भागामध्ये नुकसानाचे प्रमाण खूप अधिक आहे. कारण, मांजरा आणि तेरणा नदीचा संगम इथे होतो, व कर्नाटकातील कोगळी या बॅरेजेसमधून पाणी लवकर सोडण्यात न आल्यामुळे बॅक वॉट चा परिणाम शेतीवर झाला आहे. जिल्ह्यातील औराद शहाजानी भागात मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कर्नाटकातील पाटबंधारे विभागाने योग्य वेळी बॅरजेचे दरवाजे उघडले नसल्यामुळे बॅक वॉटरचे पाणी शेतात आले होते. 


हेही वाचा


पाण्यात अडकलेल्यांची तहान-भूक भागली; ड्रोनद्वारे प्रथमच अन्न पुरवठा, सैन्य दलही मदतीला