ST Buses Trains Cancelled: राज्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं तर आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात झालेल्या जोरदार पावसानं काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यानं नागरिकांचा खोळंबा झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर  हिंगोलीत बससेवा ठप्प झाली आहे. आगारातील ४२० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून 120 चालक आणि 125 वाहकांनी संप पुकारल्यानं प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.


देशभर सध्या जोरदार पावसामुळे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला असून आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात झालेल्या पावसानं काही रेल्वे रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेंचा मार्ग बदलण्यात आला आहे.


एसटीसंपाचा प्रवाशांना फटका


एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून (3 सप्टेंबरपासून) एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


हिंगोलीत प्रवासी ताटकळले, ४२० बस झाल्या कॅन्सल


जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत  हिंगोली आगारांमधून आज सकाळपासून एकही बस बाहेर निघालेली नसून 420 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत हिंगोली आगारात एकूण 120 चालक आणि 125 वाहक कर्तव्यावर आहे तर या सर्व कर्मचाऱ्यांनी आज बंद पुकारला आहे त्यामुळे बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी बस ची वाट पाहत आहेत.


दरम्यान, हिंगोलीत जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत  हिंगोली आगारांमधून आज सकाळपासून एकही बस बाहेर निघालेली नसून 420 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत हिंगोली आगारात एकूण 120 चालक आणि 125 वाहक कर्तव्यावर आहे तर या सर्व कर्मचाऱ्यांनी आज बंद पुकारला आहे त्यामुळे बस स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी बसची वाट पाहत आहेत.


रेल्वेही करण्यात आल्यात रद्द


आंध्र प्रदेश आणि तेलंगाना राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या मार्ग बदलून धावणार आहेत.


रद्द करण्यात आलेल्या गाड्या :


01. दिनांक 03 सप्टेंबर रोजी नांदेड येथून सुटणारी  गाडी क्रमांक 20810 नांदेडसंबलपुर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे   


02. दिनांक 03 आणि 05 सप्टेंबर रोजी साईनगर शिर्डी  येथून सुटणारी  गाडी क्रमांक 17205 साईनगर शिर्डी - काकिनाडा  एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे   


03.  दिनांक 04  सप्टेंबर काकिनाडा   येथून सुटणारी  गाडी क्रमांक 17206 काकिनाडा -  साईनगर शिर्डी  एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे  .


मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :


 01. दिनांक 03 सप्टेंबर रोजी नगरसोल येथून सुटणारी गाडी क्रमांक 12788 नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस मार्ग बदलून धावेल. ही गाडी काझीपेट  आणि  विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नाही.