एक्स्प्लोर
जळगावात राष्ट्रवादीला खिंडार, पाच नगरसेवक भाजपात
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयामध्ये आज या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यासोबतच मनसेचा एक, खान्देश विकास आघाडी (सुरेश जैन गट) एक आणि इतर एक असे एकूण आठ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयामध्ये आज या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणखी काही माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत.
जळगावमध्ये विविध वार्डामध्ये आपलं वर्चस्व असलेले विविध पक्षाचे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने महापालिकेमध्ये युती झाली तरीही महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला.
जळगाव महापालिका निवडणूक
सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी 1 ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे. जळगाव महापालिकेची मुदत 19 सप्टेंबर रोजी संपणार आहे. जळगाव महापालिकेत 19 प्रभाग असून 75 जागा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement