एक्स्प्लोर

पाच भाजप नगरसेवकांचा सेनेत प्रवेश, जळगाव मनपात भाजपला धक्का

जळगाव महानगरपालिकेतील 5 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून आणखी पाच भाजपा नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील पाच भाजप नगरसेवकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात पुन्हा भाजपला धक्का बसला आहे. नुकताच मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या 6 विद्यमान भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता जळगाव महानगरपालिकेतील पाच भाजपा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या सहा भाजप नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आज पुन्हा जळगाव महानगरपालिकेतील 5 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून आणखी पाच भाजपा नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

 जळगाव महानगरपालिकेत एकूण 74 नगरसेवक असून यात भाजपचे 58 , शिवसेनेचे 13 व एम आय एमचे 3  होते.  गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपाची एक हाती सत्ता ही जळगाव महानगर पालिकेवर होती. मात्र 18 मार्च रोजी भाजपच्या महापौर-उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपल्याने भाजपचे नवे महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने 18 मार्च रोजी महापौर उपमहापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होवून यात  शिवसेनेने भाजपाकडून सत्ता खेचून जळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवला. त्यामुळे गिरीश महाजन यांचे वर्चस्व असलेल्या व एकहाती सत्ता असलेल्या भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला. 

 दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर नगरपंचायतीचे सात विद्यमान भाजपा नगरसेवकांनी शिवबंधन हातात बांधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यातच आता जळगावातील पाच भाजप नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात शिवसेनेचे बळ वाढले आहे. 

 जळगाव महानगर पालिकेत आताचे बला बल पाहता शिवसेनेचे 13 नगरसेवक तसेच 32 भाजप चे शिवसेनेत आलेले नगरसेवक असे एकूण 45 सदस्य संख्या शिवसेनेकडे आहे. तर आणखी 5 भाजप नगरसेवक येणाऱ्या दिवसांमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले असून त्यामुळे जळगावात येणाऱ्या काळात गावात महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता बळकट राहणार असल्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget