एक्स्प्लोर

Pune Fire News : पहाटे ते आले अन् त्यांनी वाचवलं! अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना जीवनदान

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना जीवनदान दिलं आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला आहे.

Pune Fire News : पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत (Pune Fire) अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना जीवनदान दिलं आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला आहे. आज पहाटे साडे चारच्या सुमारास पौड रोडवरील आनंदनगर परिसरातील प्रभा को-ऑप सोसायटीला आग लागल्याची माहिती मिळताच कोथरूड अग्निशमन केंद्राचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. 

 घटनास्थळी पोहोचल्यावर दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने प्रभा को-ऑप सोसायटीतील तीन मजली इमारतीच्या खिडकीतून ज्वाळा येत असल्याचे ब्रिगेडच्या लक्षात आले. त्याचवेळी जळत्या घरात दोन जण अडकल्याची माहिती मिळताच जवान नळीच्या पाईपच्या साहाय्याने वर गेले आणि एका बाजूला पाणी टाकू लागले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन अधिकारी गजानन पाथरुडकर आणि नितीन घुले यांनी तात्काळ उपकरणे लावून खोलीतील आग विझवली. अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणण्यात आले. 

जवानांनी जेट स्प्रे वापरून सुमारे 10 मिनिटांत आग विझवली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. विद्यार्थी पहाटेपर्यंत अभ्यास करत होते, असे त्यांनी अग्निशमन दलाला सांगितले. पुढील खोलीतील लाकडी फर्निचर, सोफा, कपाट, खिडक्या आदी साहित्य जळून खाक झाले. एक विद्यार्थी किरकोळ दुखापत झाली आहे. कोथरूड अग्निशमन केंद्राचे अधिकारी गजानन पाथरुडकर, चालक रमेश गायकवाड आणि जवान नितीन घुले, संजय महाले, शिवाजी कोंढरे, वैभव आवरगंड हे बचावकार्यात सहभागी झाले होते.

कोथरुड परिसरात आगीची दुसरी घटना
कोथरुडमधल्या (Kothrud fire news) श्रावणधारा इमारतीतील सातव्या आणि आठव्या मजल्यावर आग लागली होती. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा सोसायटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील काही फ्लॅट्सना आग लागली होती. घटना समजताच तात्काळ आग लागलेल्या फ्लॅट्समधील आठ ते दहा लोकांना खाली आणण्यात आलं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु केलं. कोथरुडमधील आशिष गार्डनजवळ ही सोसायटी आहे. उंच इमारतीमध्ये  देण्यात आलेली स्थायी अग्निशमन यंत्रणा ही माझ्या सुरक्षिततेसाठी असून ती योग्य रितीने कार्यान्वित राहील याची तेथे राहणाऱ्या नागरिकांनी स्वतः वेळोवेळी पाहणी करून खात्री करावी, असं आवाहन इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Embed widget