एक्स्प्लोर
पालघरमध्ये बाजारपेठेतील मॉलला भीषण आग
कासामधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग लागली.

पालघर: डहाणू तालुक्यातील कासामधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या सहा जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही एक जण आगीत अडकल्याची भीती आहे. पहाटे तीनच्या सुमारास लागलेली आग अजूनही भडकतीच आहे. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचं काम सुरु आहे. मॉलमध्ये तेलाचे ड्रम आणि धान्य गोडाऊन असल्यामुळे आग अधिकच भडकत आहे. दरम्यान आग लागलेला हा मॉल मुख्य बाजारपेठेत असल्याने दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोचू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.
Before You Go
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















