एक्स्प्लोर

सामना कार्टून: आधी परभणीत, आता औरंगाबादेत गुन्हा

मुंबई: सामनातील व्यंगचित्रावर माफीनामा सादर करुनही हा वाद मिटण्याची चिन्हं दिसत नाहीत. कारण औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसात व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवक्रांती युवा सेनेच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा संजय राउत यांनी मराठा समाज आणि महिलांची जाहिर माफ़ी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. परभणीत उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा अॅड. विष्णु नवले यांच्या तक्रारीनंतर परभणीच्या नानल पेठ पोलिस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त व्यंगचित्र छापलं होतं. मोर्चांचं विडंबन करणाऱ्या या व्यंगचित्रामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. तसंच व्यंगचित्रामुळे मराठा समाजातील स्त्रियांची बदनामी झाली आहे. शिवाय हे व्यंगचित्र समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप तक्रारदार नवले यांनी केला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरेंसह ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, मुद्रक आणि प्रकाशक राजेंद्र भागवत, जिल्हा वितरक यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधान कलम 153 अ, 292, 505, 500 आणि 109 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंकडून दिलगिरी शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तील वादग्रस्त कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. माफी मागण्याचा प्रश्नच नाही : शिवसेना दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. वादग्रस्त व्यंगचित्र आणि दगडफेक मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी ‘सामना’ पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे. संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे संबंधित बातम्या : मराठा आरक्षण कसं दिलं? नारायण राणेंचं उत्तर 'सामना'तील वादग्रस्त कार्टूननंतर सेना नेत्यांच्या मनात काय खदखदतंय? शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील ‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र ‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे ‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget