एक्स्प्लोर
महिलेला अश्लिल मेसेज, माजी खासदाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
नांदेड: शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेलेले आणि सध्या भाजपत असलेले हिंगोलीचे माजी खाजदार सुभाष वानखेडे यांच्या मुलाविरोधात आयटी ऍक्ट खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका महिलेला अश्लिल मॅसेज पाठवल्याप्रकणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार सुभाष वानखेडे यांचे चिरंजीव भास्कर वानखेडे यांनी एका महिलेला अश्लिल मॅसेज पाठवल्या प्रकरणी त्यांच्यासह सातजणांविरोधात हदगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुभाष वानखेडे यांनी 15 व्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवून विजयी झाले होते. मात्र, 16 व्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपत प्रवेश केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement