एक्स्प्लोर

संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट, उपमहापौरासह 10 जणांवर गुन्हा

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवकासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आमनेसामने भिडत असून एकमेकांचे जीव घेण्याचे प्रकार घडत आहेत. राजकीय वैमनस्यातून काँग्रेसचे पालिका गटनेते मनोज म्हात्रे यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच प्रभाग क्र. 2 मिल्लतनगर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवाराची हत्या करण्याचा कट विद्यमान उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह दहा जणांच्या साथीने रचल्याचं उघड झाल्यानं शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सभापती इमरान वली मोहम्मद खान, काँग्रेस नेता मेहबूब उर्फ बबलू अंसारी, उपमहापौर अहमद हुसेन सिद्दीकी, भरत पवार, फिरोज डायमंड, अर्शद अंसारी व त्यांचे चार अज्ञात साथीदार हे हत्येच्या कटातील आरोपी आहेत. इमरान खान याने त्याची पत्नी व अहमद सिद्दीकी, मेहबूब अंसारी यांचं पॅनल तयार केलं आहे. या पॅनलच्या विरोधात समाजसेवक हमीद सत्तार शेख यांनी पॅनल तयार करुन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. हमीद शेख यांच्या पॅनलकडून आपल्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने त्याला कायमचं संपवण्याचा कट रचून अंबरनाथच्या गुंडांना सुपारी दिली होती. हमीद शेख ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये लिपिकाचे काम करत असल्याने त्याला रस्त्यातच गाठून ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. या हत्येच्या कटाचे मोबाईल रेकॉर्डिंग हमीद शेख यांचा समर्थक ननका गुप्ता याने उपलब्ध केल्याने हत्येच्या कटाची घटना सुदैवाने उघडकीस आली आणि मनोज म्हात्रेंसारख्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, 'आपण महायुती म्हणून एकत्र, पण...'
पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, 'आपण महायुती म्हणून एकत्र, पण...'
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
Maharashtra Live Blog Updates: सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार बैठक
Maharashtra Live Blog Updates: सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार बैठक

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
Embed widget