एक्स्प्लोर
शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदारासह 32 जणांविरोधात गुन्हा
औरंगाबाद : शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.
आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमधील एका शेतकऱ्याला शेतात जाऊन मारहाण केली होती. अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत.
आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 13 जून रोजीची ही घटना आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्ते शेतात घेऊन गेलेले दिसत आहेत. शेतकऱ्याला अरोरावी करत धमकी दिल्याचंही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
मुक्तार शेख सत्तार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. "सिल्लोड तालुक्यात असणारी ती आपली वडिलोपार्जित जमीन आहे. शेतात मका पेरायला गेलो होतो. मात्र आमदारासह सर्व कार्यकर्ते अचानक आले. अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. मारतील म्हणून पळायचा प्रयत्न केला पण पकडून मारलं.", असा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र एका लोकप्रतिनिधीने थेट शेतात जाऊन शेतकऱ्याला मारहाण केल्याने टीका केली जात आहे. कारण हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर त्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे ज्या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्याने त्याचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे, त्याच लोकप्रतिनिधीची गुंडगिरी शेतकऱ्याला सहन करावी लागत आहे.
दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचं समर्थन केलं आहे. "या जमिनीच्या व्यवहाराचा मी साक्षीदार आहे. मी नसतो तर त्याचा त्या वादात त्या शेतकऱ्याचा खून झाला असता.
शिवीगाळ करणं चूक आहे, पण त्या परिस्थितीत ती गरजेची होती.", असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वर्तवणुकीचं समर्थन केलं आहे.
स्पेशल रिपोर्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement