पंढरपूर : कोरोनाचा धोका लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना जिल्हाबंदीही करण्यता आली आहे. मात्र संचारबंदीचे आदेश मोडून चैत्र एकादशीला पंढरपूर विठ्ठल मंदिरात विठूरायाची पूजा करणारे भाजप आमदार सुजीतसिंह ठाकूर व मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतरही चैत्री एकादशीच्या दिवशी संचारबंदी आणि जिल्हा बंदीचे आदेश मोडून 4 एप्रिल रोजी पहाटे विठूरायाची महापूजा करणारे भाजप आमदार सुरजितसिंह ठाकूर त्यांच्या पत्नी तसेच मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे व त्यांच्या पत्नीच्या विरोधात पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम याचे उल्लंघन करून विठ्ठल मंदिरात एकत्र आले . कोरोना व्हायरसचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. याची जाणीव असताना सुद्धा विठूरायाची पूजा केल्याचाआरोप आमदार सुरजित ठाकूर आणि मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांचे ठेवले आहेत.


संपूर्ण देशात लॉकडाऊन दरम्यान सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्याचे आवाहन सरकारने केले होते. तीर्थक्षेत्रांमध्ये पूजा विधी करण्याची बंदी शासनाने घातली होती. केवळ मंदिरातील पुजारी यांना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल


दोन दिवसांपूर्वी वर्ध्याच्या आर्वी येथील भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्याविरोधात संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादाराव केचे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरापुढे धान्य मिळवण्यासाठी मोठी लांबलचक रांग लागली होती. घराजवळ मोठी गर्दी जमल्याने सोशल डिस्टंन्सिंग पाळलं गेलं नसल्याचा आरोप झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार केचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आमदार दादाराव केचे यांनी हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. केवळ 21 जणांना धान्य वाटप करून गेल्यानंतर विरोधकांनीच लोकांना धान्यासाठी पाठवून गर्दी केल्याचा आरोप केचे यांनी केला.


Coronavirus Update | काय आहे केंद्राचा कोरोनासंदर्भातील मास्टर प्लॅन?




संबंधित बातम्या : 

Cabinet Meeting | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Coronavirus Vaccine | कॅडिला कंपनीचा कोरोना लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु

केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय