अहमदाबाद : कोरोनाच्या संकटात अख्ख्या देशाला आशेचा किरण दाखवणारी बातमी समोर येत आहे. भारतातील औषध निर्मितीमधील आघाडीची कंपनी कॅडिला हेल्थकेअरनं कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. कॅडिला हेल्थकेअरचे चेअरमन पंकज पटेल यांनी एबीपी अस्मिताशी बोलताना त्याची माहिती दिली आहे.


कॅडिला कंपनीनं कोरोनावर उपचार करणारी लस तयार केली आहे आणि सध्या त्याची चाचणी प्राण्यांवर सुरु आहे. त्यातून सकारात्मक रिझल्ट हाती आल्यानंतर पुढच्या तीन महिन्यांमध्ये ही लस माणसांवर उपचाराकरिता उपलब्ध होईल, असं पंकज पटेल यांनी म्हटलं आहे.


विशेष म्हणजे कॅडिला ग्रुपकडूनच हायड्रोक्सॉक्लोरीक्विनचीही निर्मिती केली जाते. आणि आपल्याकडे अमेरिकेला पुरवल्यानंतरही हायड्रॉक्सिक्लोरीक्विनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असंही पटेल यांनी म्हटलंय. तसेच हायड्रोक्सिक्लोरीक्विन बनवण्यासाठी आपल्याला चीनची गरज नाही. कारण त्यासाठी लागणारा कच्चा माल भारतातच उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


कॅडिला ग्रुप मलेरियासाठी मोठ्या प्रमाणात औषधे देखील तयार करतो. जगभरात कोरोना व्हायरसवर कोणताही इलाज नाही. उपचारादरम्यान रूग्णांना सध्या वेगवेगळी औषधे दिली जात आहेत. कोरोनाचे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे बरे होत आहेत. अशावेळी कॅडिला ग्रुपचे प्रयत्न यशस्वी झाल्यास ते एक मोठे यश असेल.


Coronavirus Update | काय आहे केंद्राचा कोरोनासंदर्भातील मास्टर प्लॅन?