जळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पित्यानंच मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगावात हा दुर्दैवी प्रकार घडला.
धरणगावातील अब्दुल कय्युम अब्दुल रहीम यांची मुलगी नसरीनबीचा 8 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. या घटनेनंतर ती आपल्या दोन लहान मुलांसह माहेरी राहत होती. याच परिसरात राहणाऱ्या तरुणाशी नसरीनबीचे प्रेमसंबंध जुळले. मात्र त्याला घरच्यांचा विरोध होता.
या कारणावरुन मुलगी आणि पित्यामध्ये रोजच भांडण होत होतं. मंगळवारी याच वादातून अब्दुल कय्युम यांनी मुलीला मारहाण करत ओढणीनं तिचा गळा आवळला. त्यातच नसरीनबीचा मृत्यू झाला. 67 वर्षीय पिता अब्दुल कय्युम यांनी घटनेची कबुली दिली असून त्यांना 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.