सासऱ्याकडूनच जावई आणि मुलीची फेसबुकवर बदनामी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 May 2018 11:26 PM (IST)
वडिलांनीच आपल्या मुलीची व जावयाची फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर बदनामी केल्याची घटना पंढरपूरमध्ये समोर आली आहे.
NEXT
PREV
पंढरपूर : वडिलांनीच आपल्या मुलीची व जावयाची फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर बदनामी केल्याची घटना पंढरपूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी सासऱ्याला न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंढरपूर तालुक्यातील एका उच्चभ्रू वकील कुटुंबाला या अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.
आरोपी कौटुंबिक वादातून आपल्या परिवारापासून गेल्या २० वर्षांपासून दूर राहत आहेत. त्यांच्या मुलीचा विवाह गेल्या वर्षी पंढरपूर तालुक्यातील एका प्रख्यात वकीलांशी झाला असून या विवाहात त्यांना बोलावण्यात आलं नव्हते. याचाच राग मनात धरुन आरोपी सातत्याने आपल्या मुलीला व जावयांना व्हॉटसअॅपवरुन अपमानजनक मेसेज पाठवत होता. या प्रकाराला वैतागून त्याच्या मुली आणि जावयाने आपले फोन नंबरही बदलले होते. त्यामुळे त्याने फेसबुकवरुन आपल्या मुली व जावयाची बदनामी सुरु केली होती.
हा प्रकार सहन न झाल्याने या वकील जावयाने थेट सायबर सेलकडे सासऱ्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर सायबर सेलने मोबाईल लोकेशनवरून आरोपीला मुंबईतून अटक केली. आरोपीवर यापूर्वी फसवणुकीचे अनेक गुन्हेही दाखल आहेत.
पोलिसांना आरोपीकडून तब्बल १२ पेक्षा जास्त मोबाइलचे सिम कार्ड आढळून आले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -