मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टटॅग बसवणे असून अनिवार्य आहे. 15 दिवसांची मुदवाढ करण्यात आली आहे. एक डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून फास्टटॅग बंधनकारक आहे. जास्तीत जास्त लोकांनी फास्टटॅग बसवावे हा मुदतवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे. पाच दिवसात पाच लाख लोकांनी फास्टटॅग बसवून घेतले आहे. त्यामुळे सरकारने फास्टटॅग बसवण्याची मुदवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या वाहनांवर फास्टटॅगचे स्टिकर लावलेले आहेत, त्या वाहनचालकांसाठी विशेष लेन प्रत्येक टोल नाक्यावर असणार आहे. केंद्र सरकारच्या 21 नोव्हेंबर 2014 च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. या राजपत्रानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 19 जुलै 2019 रोजी विशेष निर्देश पत्रही जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, एक डिसेंबर 2019 पासून टोल फास्टॅगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांनी जर फास्टॅगसाठीच्या लेनमध्ये प्रवेश केल्यास अशा वाहनांकडूनही दुप्पट टोल आकारला जाणार आहे. फास्टटॅग लेनवर तसे सूचनाफलक देखील लावण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टटॅग बसवणे अनिवार्य आहे. टोल नाक्यावर 1 डिसेंबरपासून रोख रक्कमेच्या माध्यमातून टोल स्वीकारला जाणार नाही. फास्टटॅगमुळे 12 हजार करोड रूपयांची बचत होणार आहे. मनुष्यबळ आणि इंधनबचत याचा खर्च वाचणार आगे. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी फास्टटॅग बसवून घ्यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

फास्टटॅग यंत्रणा सर्व टोलनाक्यावर उपलब्ध आहे. भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फास्ट टॅग ऑनलाईन पर्चेस पोर्टलवरही उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर 'माय फास्टटॅग' ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.

फास्टटॅग काय आहे ?
फास्टटॅग एक पातळ इलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप गाडीच्या पुढच्या काचेवर चिटकवण्यात येणार आहे. चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बँक खात्याला जोडता येते.

फास्टटॅग कसे काम करते?
फास्टटॅग चिकटवलेले वाहन टोल नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला टोल वाहनधारकाच्या फास्टटॅग खात्यामधून वजा होणार आहे. फास्टटॅग स्कॅन कऱण्यासाठी टोल नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे फास्टटॅग चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर टोल नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाणार आहे.

फास्टटॅग वापरण्याचे फायदे
फास्टटॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार दरवर्षी देशभरात 87 हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.