यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील जुनोनी शिवारामध्ये गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दोन शेतकरी शेतातील हरभरा पिकांची पाणी द्यायला गेले होते. त्यादरम्यान त्यांच्या शेतात आलेल्या चार पैकी दोन वाघानी त्यांच्यावर हल्ला केला आणि मग जिवाच्या आकांताने ते स्वतःचा बचाव करत मागे मागे सरकत गेले वाघ त्यांच्या अगदी पुढे मग काय करावं असा प्रश्न.


परिस्थिती पाहता या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवलं आणि शेतात असलेल्या मचाणीचा आधार घेतला आणि मग सुरू झाला मृत्यूशी झुंज देण्याचा थरार. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत वाघ त्यांच्या मचाणीभोवती सतत घिरट्या घालत होते. चार वाघांच्या तावडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी जीव मुठीत घेऊन संपूर्ण रात्र मचाणीवर जागुन काढली.


यवतमाळमधील जुनोनी शिवारात ही घटना घडली. दिनेश मडावी आणि इंद्रदेव किनाके अशी वाघांशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांची नावं. यातील इंद्रदेव याला माने जवळ गंभीर दुखापत झाली आहे तर दिनेश याच्या पायावर जखम झाली आहे. या दोघांवर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सध्या उपचार सुरू आहेत.


महाविकासआघाडीतील कॅबिनेट मंत्री म्हणतात, 'मी राज्यपालांचा लाडका'


दोघेही शेतकरी हरभरा पिकांना पाणी देऊन गावाकडे निघाले होते त्याच दरम्यान त्यांच्यावर वाघाने हल्ला केला या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. सायंकाळी 6.30 वाजल्यापासून रात्री 1.30 पर्यंत चार वाघ त्यांच्या मचाणीखाली होते. या दोघांकडेही मोबाईल नसल्याने त्यांना मदतही मागणं शक्य नव्हतं. वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला तरी वाघ काही पिच्छा सोडायला तयार नव्हते. त्यामुलं काहीही करण्यास असमर्थ असणाऱ्या या शेतकऱ्यांपुढं सकाळ होण्याची वाट पाहण्यावाचून पर्याय नव्हता. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाघ त्यांच्या मचाणीपासून दूर गेले खरे. पण, त्यानंतरही वाघ पुन्हा येईल ही भीती सतत त्यांना होती त्यामुळे सारी रात्र जागून काढत ते पहाट होण्याची वाट पाहत ते शेतातच थांबले,. दरम्यान सकाळी लगतच शेतकरी शेतात आल्याचे दिसताच त्यांनी त्या शेजारच्या शेतकऱ्याला आवाज दिला आणि मोबाईल वरून गावकऱी आणि वन अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती पडताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवला. सध्या या दोन्ही शेतकऱ्यांवर यवतमाळ येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहे. या घटनेनंतर शेतात एकटे न जाण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने गावकऱ्यांना करण्यात आले आहे.


जुनोनी तहसील झरी जिल्हा यवतमाळ 

या प्रकरणी या भागातील वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहरे यांनी वाघाकडून दोन व्यक्ती वर हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले मात्र या भागातील नागरिकांना रात्री दरम्यान शेतात जाऊ नये असे सुचविण्यात आले आणि तसा मज्जाव केला तरी ते या भागात रात्री 10 च्या सुमारास गेले असं वनधिकारी यांनी मोबाईल वर अशी माहितीसांगितली तसेच मचाण खाली वाघ होता काय याबाबत तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले .