एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतावर राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झालंय.
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. बालाजी वाघमारे (वय वर्ष 70)असं हल्ल्यात मृत्य पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बालाजी वाघमारे कोलारा गावातील रहिवासी असून शुक्रवारी संध्याकाळी टेकाडी-मांडवझरी मार्गावर असलेल्या शेतात राखण करण्यासाठी गेले होते. आज सकाळी त्यांच्या पत्नीला त्यांचा मृतदेह शेतात आढळला. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात दुसरा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ताडोबा प्रकल्पाच्या पळसगाव बफर झोनमधील कोलारा शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोलारा गावाला लागुन असलेल्या स्वतःच्या शेतात पिके राखण्यासाठी शेतकरी कालव्यातून शेताकडे जात होता. वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून शेतकऱ्याला जागेवर ठार केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. शनिवारी सकाळी अकरा वाजता मृत शेतकऱ्याची पत्नी गिरजाबाई शिदोरी घेवुन शेतात गेली तेव्हा पतीची चप्पल, बॅटरी, कपडा व रक्त पडलेले आढळून आले. शेताच्या सभोवताली चक्कर मारली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मृत शेतकऱ्याच्या वनमजुर मुलाला वनविभागात स्थायी स्वरूपाची नोकरी देण्याची मागणी ग्रामस्थांनी पुढे रेटली आहे.
संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये 'सुलतान' वाघाचं आगमन!
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कर्मचारी वसाहतीत वाघाचा संचार -
जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील प्रसिद्ध अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कर्मचारी वसाहतीत वाघाचा संचाराने एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा वाघाच्या वावराने रहिवासी धास्तीत आहेत. गेले पाच तास या वसाहतीच्या विविध भागात वाघाचे दर्शन होत आहे. या वाघाला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. वाघ वावरत असलेल्या परिसरात कर्मचारी वर्गाची मोठी वस्ती असल्याने वनविभाग सतर्क झाला असून कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी वनाधिकारी परिसरात दाखल झाले आहेत. रात्रीचा सुमार असल्याने कंपनीत ये-जा करणारे कामगार आणि रहिवासी देखील चिंतेत सापडले आहेत. सध्या या भागात वाघाच्या भीतीमुळे मोठा कोलाहल माजला आहे.
Chandrapur | पर्यटकांच्या जिप्सीने अडवली वाघाची वाट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement