उस्मानाबादेत शेतातील विजेच्या खांबाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला करंट उतरला होता. पेरणी सुरु असताना बैलाचा खांबाला स्पर्श झाल्याने बैलाला कंरट लागला. त्यावेळी बैलाला वाचवण्यासाठी गेलेल्या रामेश्वर यांनाही करंट लागला.

उस्मानाबाद : उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील बोर्डा येथे रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शनिवारी पेरणी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. या घटनेत बैलाचाही मृत्यू झाला.
रामेश्वर शेळके हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतीसोबतच ते मजुरीचे कामही करत होते. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग सुरु आहे. चार पैसे मिळावेत यासाठी बोर्डा येथीलच अनंत भगवान शेळके यांच्या शेतात पेरणीच्या कामासाठी ते गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली.
शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला करंट उतरला होता. पेरणी सुरु असताना बैलाचा खांबाला स्पर्श झाल्याने बैलाला कंरट लागला. त्यावेळी बैलाला वाचवण्यासाठी गेलेल्या रामेश्वर यांनाही करंट लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. रामेश्वर यांच्या अशा अकाली जाण्य़ाने कुटुंबाचं छत्र हरवलं आहे.
रामेश्वर शेळके यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत तर मुलगा यावर्षी दहावीच्या वर्गात शिकत आहे. मुलाला खुप शिकवण्याची रामेश्वर यांची इच्छा होती. मात्र या दुर्घटनेमुळे मुलाला चांगलं शिक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न अधुरचं राहिलं.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या






















