एक्स्प्लोर

वेळा अमावास्या... शेतात खास मेजवानी, बळीराजाच्या आनंदाचा सण!

उस्मानाबाद: अनंत अडचणीतून मार्गक्रमण करणारा बीड, लातूर, उस्मानाबादचा शेतकरी आज आनंदोत्सव साजरा करतोय. कारण आहे 'वेळा अमावास्येचं'. समस्त शेतकरी बांधवांचा जणू आज सणच. शेतकरी राजा धरणी मातेची पूजा करून मित्र मंडळी आणि पाहुण्यांना मेजवानी देतो. वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी शेतीशिवार आज गर्दीनं फुलून गेली होती. यात मुस्लिम कुटुंबही मागे नाहीत. दुष्काळ असो कि सुकाळ. पाऊस असो किंवा नसो. प्रत्येक शेतकरी वेळा अमावस्या मात्र जोरात साजरी करतो. आजही  हेच चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत धरणी मातेची पूजा केली. चांगल पीक यावं, शेतीमालाला चांगला भाव मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली. धरणी मातेच्या पोटातून भरघोस पीक यावं असं साकडं घातलं. शेतात पाच पांडवांची पूजा मांडण्यात आली होती. आज शेतकऱ्याने धान्य लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी शेतकरी वर्गात वेळा अमावस्येची मोठी उत्सुकता असते. घरातल्या महिलांची स्वयंपाक बनवण्यासाठी लगबग सुरु असते. रात्र जागून महिला वेळा अमावस्येचा लज्जतदार मेनू बनवतात. मित्र आणि पाहुणे मंडळी पोट भरून जेवल्यावर त्यांना मिळणारा आनंद वेगळाच असतो. घरात बनवलेला स्वयंपाक गृहिणी आपल्या डोक्यावर घेऊन शेतात नेतात. पूजा झाल्यावर जेवणाची पंगत बसते. आज शेतात बसून जेवण्याचा  आनंद  काही औरच  असते.  यानिमित्ताने  दूरचे नातेवाईक आणि मित्र मंडळी एकत्र येतात. वेळा अमावस्येचा मेनू सुद्धा खास असतो. शेतातल्या देवतांना आजच्या जेवणाचा प्रथम नैवेद्य दिला जातो. धरणी मातेची पूजा, खास मेनू आणि गप्पा मारत केलेलं जेवण, यात दिवस कधी संपतो ते कळतही नाही. शेतातून पीक काढणं आणि त्यातून पैसे कमावणं शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनलं आहे. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत हतबल झालेला शेतकरी धरणी मातेला साकड घालतो. शिवाय शासनाकडेही  आशावादी नजरेन बघतो आहे. किती तरी संकट समोर असतानाही आज वेळा अमावस्या साजरी करण्यात बळीराजा कुठेच कमी पडत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget