एक्स्प्लोर

काँग्रेस आमदाराची गुंडगिरी, शेतात जाऊन शेतकऱ्याला मारहाण

औरंगाबाद : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एका शेतकऱ्याला शेतात जाऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 13 जून रोजीची ही घटना आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्ते शेतात घेऊन गेलेले दिसत आहेत. शेतकऱ्याला अरोरावी करत धमकी दिल्याचंही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मुक्तार शेख सत्तार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सिल्लोड तालुक्यात असणारी ती आपली वडिलोपार्जित जमीन आहे. शेतात मका पेरायला गेलो होतो. मात्र आमदारासह सर्व कार्यकर्ते अचानक आले. अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. मारतील म्हणून पळायचा प्रयत्न केला पण पकडून मारलं, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र एका लोकप्रतिनिधीने थेट शेतात जाऊन शेतकऱ्याला मारहाण केल्याने टीका केली जात आहे. कारण हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर त्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे ज्या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्याने त्याचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे, त्याच लोकप्रतिनिधीची गुंडगिरी शेतकऱ्याला सहन करावी लागत आहे. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचं समर्थन केलं आहे. या जमिनिच्या व्यवहाराचा मी साक्षीदार आहे. मी नसतो तर त्याचा त्या वादात त्या शेतकऱ्याचा खून झाला असता. शिवीगाळ करणं चूक आहे, पण त्या परिस्थितीत ती गरजेची होती, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वर्तवणुकीचं समर्थन केलं आहे. पाहा मारहाणीचा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
Embed widget