Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. पंढरपूरच्या जवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात. मात्र, महाराष्ट्रात अशीही काही विठ्ठलाची मंदिरं आहेत जी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखली जातात. आषाढी वारीनिमित्ताने ही मंदिरं देखील वारकऱ्यांनी गजबजली आहेत. महाराष्ट्रात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखली जाणारी अशी कोणती मंदिरं आहेत हे जाणून घेऊयात. 

  


1. कोल्हापूर जिल्ह्यातील - नंदवाळ


कोल्हापूरपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेले प्रतिपंढरपूर 'नंदवाळ' हे एक धार्मिक स्थळ आहे. या गावाला विठ्ठलाच्या वास्तव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या गावास प्रतिपंढरपूर असे संबोधतात. या ठिकाणी असणाऱ्या हेमांडपंती दगडी मंदिरात विठ्ठल रोज वास्तव्यास असतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. नंदवाळ या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर आणि शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी या ठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे. 


2. औंढ येथील विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर 


औंढ येथील विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर सुमारे 285 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात बांधले गेले आणि त्या वेळी औंढ गाव महादजी शिंदे यांच्या संरक्षणाखाली होते. मंदिर केदारजी शिंदे आणि शालूबाई शिंदे यांनी बांधले होते. येथे त्यांच्या समाधीचे निवासस्थान आहे. हे मंदिर केवळ सुंदरच नाही तर त्याच्या स्थानावरही आकर्षण आहे. मुळा-मुठा नदी जवळून जात असलेल्या औंढ पुलाच्या अगदी खाली एका विशाल चौकोनी कंपाऊंडवर बांधलेले हे मंदिर आहे.


3. मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिर 


आषाढी एकादशी या महाएकदशी समजल्या जाणार्‍या दिवशी विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंढरपूरात दाखल होतात. परंतु ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं असे अनेक मुंबईकर भाविक वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी गर्दी करतात. वडाळ्याचे विठू माऊलीचे मंदीर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी असते. 


4. अमरावती : विदर्भातील हजारो भाविक आषाढी एकादशीला विदर्भाची पंढरी कौडण्यपूर मध्ये येणार


राज्यभरातील लाखो भाविक हे दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये जात असतात... परंतु, अनेक भाविक जे आहेत त्यांना पंढपुरला जाणं शक्य होत नाही. असे विदर्भातील हजारो वारकरी हे विठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपूर येथे आषाढी एकादशीला दर्शनासाठी येत असतात. उद्या देखील हजारो भाविक कौडण्यपूरला येणार आहे. कौडण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेर घर आहे. 


महत्वाच्या बातम्या :