नागपूर: अत्यंत महागड्या एमडी नावाचे ड्रग्स खरेदी करण्यासाठी चोर बनलेल्या तरुणाने ड्रग्सची हौस भागवण्यासाठी तब्बल 43 महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या. गेल्या काही महिन्यात नागपुरात सातत्याने भर रस्त्यात, मॉर्निग वॉक करायला निघालेल्या महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला सापळा लावून अटक केली आहे. दुचाकीवर अत्यंत तीव्र गतीने येऊन हा चोर महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावून पळून जायचा. अनिल मंगलानी असे या अवघ्या 23 वर्षांच्या चोराचे नाव आहे.


सणासुदीच्या काळात महिलांना सोनसाखळी चोरांची प्रचंड भीती असते. तीव्र गतीने दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे हे चोरटे राज्यातील सर्वच शहरात महिलांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरले आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी अशा एका सराईत सोसाखळी चोराला अटक केली आहे. हा चोरटा अत्यंत महाग अमली पदार्थांची नशा करण्यासाठी सोनसाखळी चोरत होता. केवळ अमली पदार्थांची स्वतःची हौस भागवण्यासाठी त्याने आतापर्यंत एक दोन नव्हे तर 43 महिलांना लुटले आहे.

अनिलने आजवर 43 महिलांच्या सोनसाखळी हिसकावल्या आहेत. कमी वयात त्याच्या गुन्ह्यांच्या भल्या मोठ्या जंत्री मागे आहे. एमडी ( methylene dioxy methamphetamine) या भयावह ड्रग्जची सवयअनिलला एमडी लहान वयातच लागली. महागडी नशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 3 हजार ते 5 हजार रुपये प्रति 10 ग्राम एवढ्या प्रचंड किमतीत उपलब्ध होणाऱ्या या ड्रग्सला खरेदी करण्यासाठी अनिलकडे पुरेसे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने चेनस्नेचर बनण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीला तो एखादा दुसराच गुन्हा करायचा. मात्र, हळू हळू दुचाकीवर अत्यंत तीव्र गतीने महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावून पळून जाण्याचा कौशल्य त्याने हस्तगत केला आणि गेल्या काही महिन्यात नागपुरात तब्ब्ल 43 महिलांना लुटले. बऱ्याचदा त्याला अटक ही झाली. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर ही तो पुन्हा-पुन्हा तेच काम करू लागला. गेल्या एका महिन्यात त्याने नागपुरच्या विविध वस्त्यांमध्ये मॉर्निंग वॉक करायला निघालेल्या 11 महिलांच्या सोनसाखळ्या लुटून नागपूर पोलिसांची डोकेदुखी वाढविली होती. मात्र, काल पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली असून त्याने गेल्या एका महिन्यात 11 आणि त्याच्यापूर्वी 32 गुन्हे अशी एकूण ४2 गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे.

काय आहे एमडी?
-एमडी म्हणजे - methylene dioxy methamphetamine
-हे रसायन आधारित अत्यंत महाग ड्रग्स / अमली पदार्थ
-श्रीमंतांचे अमली पदार्थ म्हणून ओळख
- 5 हजार रुपयात फक्त 10 तोळे एवढे जास्त दार
-मध्यमवर्गीय तरुण हे ड्रग्स घेण्यासाठी बनत आहेत गुन्हेगार?