एक्स्प्लोर

मराठा मोर्चे उस्फूर्त नव्हते आणि आजही नाहीत : पुरुषोत्तम खेडेकर

उस्मानाबाद : मराठा मोर्चांना नेतृत्त्व नाही आणि निश्चित अशी काही ध्येय-धोरणं नाहीत. यातला एकही मोर्चा उस्फूर्त नव्हता आणि आजही नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. पुढील दोन वर्षे मराठा संघटनेच्या बांधणीचा पुरुषोत्तम खेडेकरांनी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानिमित्त उस्मानाबादमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ते एबीपी माझाशी बोलत होते. फडणवीस सरकारचं काम चांगलं चाललं आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, “फडणवीस सरकारचं कामकाज कुठल्या अंगाने चांगलं आहे, हा एक वेगळा विषय आहे. पण सामान्य माणसाच्या अंगाने पाहिलं तर काम चाललंय, हे म्हणणंच मोठं अवघड आहे. कारण सामान्य लोकांना शासन अस्तित्त्वात आहे, असं वाटत नाही.” “शरद पवार हे सत्यशोधक कुटुंबामध्ये जन्माला आले आहेत. फुले-शाहू-आंबेडकारी विचारधारेचा प्रभाव पवारांवर आहे. त्यामुळे त्यांना अजूनही काही बाबी ब्राम्हण-ब्राम्हणेतर या अंगाने दिसत असतात. त्या चालतातही. त्यात काही वावगं आहे, अशातला भाग नाही.”, असेही यावेळी खेडेकर म्हणाले. “सकल मराठा क्रांती मोर्चापासून मी दूर राहिलो होतो. या मोर्चांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यामुळे एवढे मोठे मोर्चे इतरही समाजाचे निघाले. मोर्चे निघणं आणि त्यातून काहीही नुकसन न होणं, याकडे जरी सकारात्मक अंगाने बघितलं, तरी कुठल्याही शासनकर्त्याला त्याच्या कार्यकाळात असे अशांत स्वरुपाचे मोर्चे निघणं अभिमानास्पद नाही.”, असं मत पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलं. पुरुषोत्तम खेडेकर कोण आहेत? सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता असलेले पुरुषोत्तम खेडेकर हे 'मराठा सेवा संघा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘संभाजी ब्रिगेड' आणि इतर मराठा समाजाच्या संघटनांशी संबंधित असून, 'शिवधर्म' संस्थापनाची भूमिका घेऊन राज्यभर प्रचार आणि प्रसार करतात. 2004 सालच्या जेम्स लेन प्रकरणात पुण्याच्या 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रा'वर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची भूमिका महाराष्ट्रभर अधिक चर्चेत आली. खेडेकरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेषत: ब्राम्हण वर्गावरील टीकात्मक लिखाणामुळे ते कायम वाद आणि चर्चेत राहिले आहेत. 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या त्यांच्या पुस्तकातील काही लिखाणामुळे त्यांच्यावर खटलाही चालला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या मराठा संघटनांच्या समितीतही ते सहभागी होते. त्यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या चिखली मतदारसंघातून आमदार होत्या. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Chandrapur Crime News: चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Family News: विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget