एक्स्प्लोर

माजी खासदार निवेदिता माने यांचा राष्ट्रवादीला रामराम, शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंगेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. आता हातकणंगले मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी  शिवसेनेकडून धैर्यशिल माने निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. माने यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. निवेदिता माने ह्या इचलकंरजी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. तर त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने हे पक्षातील दिग्गज नेते मानले जातात. माने परिवारांचा जनमाणसात मोठा प्रभाव आहे. या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे महाआघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. म्हणून त्या ठिकाणी धैर्यशिल माने यांना संधी नसल्याने हा प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून माने पक्षावर नाराज होते. कोल्हापूर दौऱ्यादरम्यानही शरद पवारांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली नाही. त्यामुळे माने गट दुखावला गेला होता. तसेच शरद पवार जुन्या सहकाऱ्यांना विसरल्याची खंत माने यांनी व्यक्त केली आहे. या प्रवेशामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशिल माने असा सामना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Embed widget