एक्स्प्लोर

नारळासमोरील बटन दाबलं तरी भाजपला मत, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली.

मुंबई : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपाला मिळालेल्या आश्चर्यकारक निकालांचा बुरखा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयानेच फाडला आहे. कारण बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली. बुलडाण्यातील सुलतानपुर जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्यात निवडणूक झाली होती. मात्र, नारळासमोरील बटन दाबल्यास कमळाच्या चिन्हावर लाईट लागल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. 2017 मध्ये महाराष्ट्रासह देशभरात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. याशिवाय पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठं यश मिळालं होतं. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएममध्येच घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता. ईव्हीएम मशिनमधील कोणतंही बटण दाबल्यास भाजपलाचं मत दिलं जातंय, असा आरोप विरोधकांनी केला होता. पण निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले होते. विशेष म्हणजे, आयोगानं विरोधकांना ईव्हीएममध्ये छेडछाड करुन दाखवण्याचं आव्हानही दिलं होतं. हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्यानिस्ट पक्षानं उचललं होतं. यासाठी आयोगाच्या वतीनं आयोजित हॅकेथॉनमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड करुन दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांना चार-चार तासाचा वेळ दिला होता. पण दोन्ही पक्ष हे आव्हान पूर्ण करण्यात असमर्थ ठरले होते. पण आता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानंच आयोग आणि भाजपच्या यशाचा बुरखा टराटरा फाडला आहे. ईव्हीएम मशीनमधील कोणतंही बटण दाबल्यास कमळाच्या चिन्हा समोरचा लाईट लागत असल्याचं चौकशी अहवालात नमुद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget