एक्स्प्लोर
पिंपरीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. रणजीत तांडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. रणजीत हॉस्टेलमधील हजेरीला न आल्याने काल रात्री हा प्रकार उघडकीस आला. रविवार - सोमवारच्या दरम्यान रणजीतने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रणजीत मूळचा बारामतीचा असून तो पिंपरीच्या पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने आत्महत्या का केली याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
करमणूक
भारत























