एक्स्प्लोर

सिंधुदुर्गातील मोर्ले गावात हत्तीकडून तिघांचा पाठलाग, पुलाच्या पाईपमध्ये लपून बसल्याने जीव वाचला

हत्तीच्या पाठलागामुळे जीव मुठीत धरुन हे तिघेही पाईपमध्ये बसून होते. साधारणपणे अर्धा तास हत्ती त्या पाईपमध्ये सोंड घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या तिघांचे प्राण वाचले.

सिंधुदुर्ग : तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रात्री हत्तीचा थरार गावातील तीन व्यक्तींनी अनुभवला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भेकुर्ली गावातून मोर्ले गावात घरी जात असताना दुचाकीची लाईट फणसाच्या झाडाखाली फणस खात असलेल्या टस्कर हत्तीच्या डोळ्यावर पडली आणि त्याने पाठलाग सुरु केला. हत्ती पाठलाग करतोय हे समजताच. त्या तिघांनीही दुचाकी तिथेच टाकत पळायला सुरुवात केली. टस्कर हत्तीने पाठलाग केल्यामुळे हत्तीपासून वाचण्यासाठी जवळच रस्त्याचा पूल होता. या पुलाला सिमेंटचा पाईप होता. त्या तिघांनी या पाईपमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सुमारे तीन तास बसून काढले. साधारणपणे अर्धा तास हत्ती त्या पाईपमध्ये सोंड घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय मध्येच ओरडत सुद्धा होता.

हत्तीच्या पाठलागामुळे जीव मुठीत धरुन हे तिघेही पाईपमध्ये बसून होते. विनायक देसाई, सदा देसाई, सचिन देसाई या तिन्ही व्यक्तींना रात्रीच्या निरव शांततेत हत्तीचा थरार याची देही याची डोळा अनुभवला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या तिघांचे प्राण वाचले. गेल्या महिन्याभरापासून तस्कर हत्ती मोर्ले गावात बागायतीचे, शेतीचे नुकसान करत आहेत. वस्तीतही वावर वाढला आहे. त्यामुळे मोर्ले गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात गेली दहा ते बारा वर्षे हत्तींचा वावर आहे. तिलारी धरणाचं मुबलक पाणी, आजूबाजूला केळी, अननस, नारळ, पोफळीच्या बागा असल्याने खाद्यही मुबलक प्रमाणात असल्याने हत्ती याठिकाणी स्थिरावले. लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची रहदारी कमी झाल्याने हत्ती जंगलातून आणि रस्त्यावर मुक्तपणे फिरु लागले. त्यामुळे काल रात्री हत्ती रस्त्यालगत असलेल्या फणसाच्या झाडाखाली फणस खात असताना, डोळ्यावर लाईट पडल्याने त्याने तिघांचा पाठलाग केला.

तिलारी खोऱ्यातील सध्यस्थितीत असणाऱ्या पाच हत्तींना या भागातून घालवण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात गेले. मात्र हत्ती तिलारीच्या खोऱ्यात स्थिरावले आहेत. केर, भेकुर्ली, मोर्ले या गावातील भातशेती, केळी बागायती, नारळाच्या झाडांचे नुकसान करत आहेत.

वन्य प्राणी प्रेमींकडून तिलारी खोऱ्यात हत्तींसाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी केली जात आहे. हत्तीसाठी अभयारण्य उभारावे अशी मागणी जिल्ह्यातील प्राणीप्रेमीकडून केली जात आहे. गेली अनेक वर्षे तिलारी खोऱ्यात हत्तींचा वावर असल्याने ही मागणी केली जात आहे. कर्नाटकमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत दोडामार्गमध्ये हत्ती येतात. त्याठिकाणी हत्तींना जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यासाठी सौर कुपन उभारण्याचा प्रस्ताव वनविभागाचा आहे.

Sindhudur Elephant Chasing| सिंधुदुर्गात हत्तीकडून तिघांचा पाठलाग,पुलाच्या पाईपमध्ये लपल्याने बचावले

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
Devendra Fadnavis: गडचिरोली 100% नक्षलमुक्त ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन अन् स्टील हबपर्यंत...; मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानांपुढे विकासाचा रोडमॅप सांगितला
गडचिरोली 100% नक्षलमुक्त ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन अन् स्टील हबपर्यंत...; भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानांपुढे विकासाचा रोडमॅप सांगितला
Karad Crime: इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या प्लॅटमध्ये आयुष्य संपवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेवटच्या ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडमध्ये नेमकं काय घडलं?
इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या प्लॅटमध्ये आयुष्य संपवलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शेवटच्या ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडमध्ये नेमकं काय घडलं?
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Embed widget