मुंबई : मतदारराजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस अखेर येऊन ठेपला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि दहा जिल्हा परिषदांतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होणार आहे. निवडणूक आयोगासह पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षही सज्ज झाले आहेत. 23 तारखेला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दोन्ही टप्प्यांची मतमोजणी होणार आहे.

आज साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संध्याकाळी साडेपाचपर्यंत जितके मतदार रांगेत उभे राहतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

निवडणूक काळात मतदारांना मार्गदर्शन करणार 'ट्रू वोटर' अॅप


मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत.

शहरांमध्ये 1 कोटी 95 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडणार आहे.

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा


जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेतील 2 हजार 956 उमेदवारांचं भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. पंचायत समित्यांच्या 1288 जागांवर 5167 उमेदवार रिंगणात आहेत.

महापालिका निवडणुकांविषयी सर्व माहिती एकाच क्लिकवर


दहा महानगरपालिकेतले सध्याचे पक्षीय बलाबल


1) मुंबई – एकूण सदस्य संख्या – 227

सत्ता – शिवसेना-भाजप युती

शिवसेना – 75
भाजप – 31
काँग्रेस – 52
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
मनसे – 28
समाजवादी पार्टी – 9
अखिल भारतीय सेना – 2
भारिप – 1
रिपाइं – 1
अपक्ष – 15

2) ठाणे – एकूण सदस्य संख्या – 130

सत्ता – शिवसेना-भाजप युती

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग, त्यानुसार एकूण 33 प्रभाग असतील म्हणजेच 131 सदस्य निवडून येतील.

शिवसेना – 57
भाजप – 8
काँग्रेस – 13
राष्ट्रवादी – 30
मनसे – 7
अपक्ष – 15

3) उल्हासनगर – एकूण सदस्य संख्या – 78

सत्ता – शिवसेना-भाजप युती

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 78 सदस्य निवडून येतील. (2 प्रभागात 3 उमेदवार)

शिवसेना – 20
भाजप – 11
आरपीआय – 4
साई – 7
बसपा – 2
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
काँग्रेस – 20
अपक्ष – 6

4) पुणे – एकूण सदस्य संख्या -156

सत्ता – राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील.

राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 29
मनसे – 28
शिवसेना – 15
भाजप – 26
आरपीआय – 2

5) पिंपरी – एकूण सदस्य संख्या – 128

सत्ता – राष्ट्रवादी

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 32 प्रभाग असतील म्हणजेच 128 सदस्य निवडून येतील.

राष्ट्रवादी – 83
शिवसेना – 15
काँग्रेस – 13
मनसे – 4
भाजपा – 3
आरपीआय – 1
अपक्ष – 9

6) सोलापूर – एकूण सदस्य संख्या – 102

सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 26 प्रभाग असतील म्हणजेच 102 सदस्य निवडून येतील. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग)
काँग्रेस – 44
राष्ट्रवादी – 14
भाजप – 26
शिवसेना – 10
बसपा – 3
माकपा – 3
आरपीआय – 1
अपक्ष – 1

7) नाशिक – एकूण सदस्य संख्या – 122

सत्ता – मनसे-अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 31 प्रभाग असतील म्हणजेच 122 सदस्य निवडून येतील. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार)

मनसे – 39
शिवसेना-रिपाइं – 22
काँग्रेस – 16
भाजपा – 14
राष्ट्रवादी – 20
माकप – 3
अपक्ष – 6
जनराज्य – 2

8) नागपूर – एकूण सदस्य संख्या – 145

सत्ता – भाजप

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 38 प्रभाग असतील म्हणजेच 151 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)

भाजप – 63
काँग्रेस – 41
शिवसेना – 6
राष्ट्रवादी – 6
बसपा – 12
मनसे – 2
मुस्लीम लीग – 2
अपक्ष – 13

9) अकोला – एकूण सदस्य संख्या – 73

सत्ता – सेना-भाजप युती

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 80 सदस्य निवडून येतील.

भाजप – 18
काँग्रेस – 18
शिवसेना – 8
भारिप-बमसं – 8
राष्ट्रवादी – 5
शहर सुधार समिती – 3
यूडीएफ – 2
समाजवादी पक्ष – 1
मनसे – 1
अपक्ष – 9

10) अमरावती – एकूण सदस्य संख्या – 87

सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 21 प्रभाग असतील म्हणजेच 87 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)

भाजप – 7
शिवसेना – 11
राष्ट्रवादी – 18
काँग्रेस – 25
बसपा – 6
जनविकास काँग्रेस – 6
जनविकास आघाडी – 7
आरपीआय (अ) – 2
आरपीआय (ग) – 1
इतर – 4

मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज


महापालिका (जागा) : उमेदवार रिंगणात

मुंबई (227)- 2,275,

ठाणे (131)- 805,

उल्हासनगर (78)- 479,

पुणे (162)-1,090,

पिंपरी-चिंचवड (128)- 774,

सोलापूर (102)- 623,

नाशिक (122)- 821,

अकोला (80)- 579,

अमरावती (87)- 627,

नागपूर (151)- 1,135

एकूण (1,268)- 9,208

पंचायत समिती निवडणुकीतील टॉप-10 कोट्यधीश उमेदवार


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (एकूण जागा): उमेदवार रिंगणात


रायगड (59)- 187,

रत्नागिरी (55)- 226,

सिंधुदुर्ग (50)- 170,

नाशिक (73)- 338,

पुणे (75)- 374,

सातारा (64)- 285,

सांगली (60)- 229,

सोलापूर (68)- 278,

कोल्हापूर (67)- 322,

अमरावती (59)-417,

वर्धा (2)- 8,

यवतमाळ (6)- 34

गडचिरोली (16)- 88.

एकूण (654)- 2,956.