मुंबई : मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीला लागले आहेत.


मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तर शहरांमध्ये 1 कोटी 95 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडणार आहे.

मतदान भीतीमुक्त आणि चांगल्या वातावरणात पार पडावं यासाठी 33 हजार जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी तीन हजार जण मुंबईतील आहेत. तसंच पोलिसांनीही संवेदनशील ठिकाणी मोठी कुमक तैनात केली आहे.

मतदानासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे

*16 फेब्रुवारीला (पहिला टप्पा) 15 जिल्हा परिषदांसाठी 69 टक्के मतदान

*21 फेब्रुवारीला (दुसरा टप्पा) होणाऱ्या 10 जिल्हा परिषदांतील 654 जागांसाठी 2956 उमेदवार रिंगणात

*21 फेब्रुवारीला (दुसरा टप्पा) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 1 कोटी 80 लाख मतदार

*पंचायत समित्यांच्या 1288 जागांवर 5167 उमेदवार

*22 हजारपेक्षा जास्त पोलिंग स्टेशन, दीड लाख कर्मचारी आणि जवळपास तितकेच पोलिस

*दहा महानगरपालिकांसाठी 1268 जागा, 9208 उमेदवार रिंगणात, 1.95 कोटी मतदार

*21 हजार पोलिंग स्टेशन. 1 लाख 30 हजार कर्मचारी, अधिकारी

*3 हजार 461 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार

*1 हजार 754 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचे उमेदवार

*2 हजार 663 अपक्ष उमेदवार

मुंबई महापालिका :

*227 जागांसाठी 2 हजार 275 उमेदवार, 95 लाख मतदार

*7 हजार 304 पोलिंग स्टेशन, 45 हजार कर्मचारी, अधिकारी

*633 राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार

*428 प्रादेशिक मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवार

*717 अपक्ष उमेदवार

*आचारसंहिता उल्लंघनच्या 240 केसेस राज्यात दाखल

*291 जण तडीपार

*33 हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, यापैकी 3 हजार मुंबईतील

*आतापर्यंत 61 लाख राज्यभरात कॅश जप्त

महापालिका (जागा) : उमेदवार रिंगणात

मुंबई (227)- 2,275,

ठाणे (131)- 805,

उल्हासनगर (78)- 479,

पुणे (162)-1,090,

पिंपरी-चिंचवड (128)- 774,

सोलापूर (102)- 623,

नाशिक (122)- 821,

अकोला (80)- 579,

अमरावती (87)- 627,

नागपूर (151)- 1,135

एकूण (1,268)- 9,208

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (एकूण जागा): उमेदवार रिंगणात


रायगड (59)- 187,

रत्नागिरी (55)- 226,

सिंधुदुर्ग (50)- 170,

नाशिक (73)- 338,

पुणे (75)- 374,

सातारा (64)- 285,

सांगली (60)- 229,

सोलापूर (68)- 278,

कोल्हापूर (67)- 322,

अमरावती (59)-417,

वर्धा (2)- 8,

यवतमाळ (6)- 34

गडचिरोली (16)- 88.

एकूण (654)- 2,956.

एकूण व्याप्ती

  • एकूण जागा- 3,210

  • उमेदवार- 17,331

  • मतदार- 3,77,60,812

  • मतदान केंद्रे- 43,160

  • मतदान यंत्रे- सीयू 68,943 व बीयू- 1,22,431

  • कर्मचारी- 2,73,859


महानगरपालिका निवडणूक महत्त्वाचे मुद्दे


  • एकूण जागा- 1,268

  • उमेदवार- 9,208

  • पुरूष मतदार- 1,04,26,289

  • महिला मतदार- 91,10,165

  • इतर मतदार- 742

  • एकूण मतदार- 1,95,37,196

  • मतदान केंद्रे- 21,001

  • मतदान यंत्रे- सीयू- 52,277 व बीयू- 56,932

  • कर्मचारी- 1,29,761

  • वाहने- 6,868


जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महत्त्वाचे मुद्दे


  • जि. प. एकूण जागा- 654

  • जि. प. उमेदवार- 2,956

  • पं.स. एकूण जागा- 1,288

  • पं.स. उमेदवार- 5,167

  • पुरूष मतदार- 94,43,911

  • महिला मतदार- 87,79,604

  • इतर मतदार- 101

  • एकूण मतदार- 1,82,23,616

  • मतदान केंद्रे- 22,159

  • मतदान यंत्रे- सीयू 43,666 व बीयू- 65,499

  • कर्मचारी- 1,44,098


कायदा व सुव्यवस्थेबाबत कार्यवाही

  • प्रतिबंधात्मक कारवाई-54,025

  • नाकाबंदी- 9,700

  • अवैध शस्त्र जप्त- 211

  • रोकड जप्त- 75,66,980 (प्रकरणे 17)

  • अवैध दारू- 6,81,556 लीटर (प्रकरणे 10,898)

  • आचारसंहिता भंग प्रकरणे- 338

  • मालमत्ता विद्रुपीकरण- 77

  • तडीपार- 371


ट्रु वोटर ॲप

  • ट्रु वोटर ॲप डाऊनलोड- 1,35,000

  • यादीत नाव, प्रभाग व मतदान केंद्रांचा शोध- 9 लाख मतदार

  • मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी मार्गक्रमण (मतदार) 98,000

  • प्रभागातील उमेदवाराची माहिती पाहणाऱ्यांची संख्या- 45,000

  • अधिकाऱ्यांची नोंदणी 22,270


कॉप ॲप

  • ॲप डाऊनलोड 20,000 (रेटिंग- 4.1)

  • 5,345 अधिकाऱ्यांनी नोंदणी केली

  • 5,382 मतदारांनी नोंदणी केली

  • ॲपद्वारे एकूण तक्रारी 501 दाखल


मिस् कॉल प्रतिज्ञा

  • मतदारांसाठी 9029901901 या क्रमांकावर मिस् कॉल सुविधा

  • एकूण 11,13,022 मतदारांकडून मिस् कॉलद्वारे प्रतिज्ञा

  • चॅटबॉट सुविधेचा 12,796 जणांकडून वापर