एक्स्प्लोर

28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार, भाजपचा आक्षेप

येत्या 27 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, 28 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

मुंबई : 22 डिसेंबरपासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार का? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. मात्र, अखेर यावर निर्णय होणार आहे. येत्या 27 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, 28 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, या निवडीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. 

कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. यानंतर येत्या 28 डिसेंबरला अध्यक्षांची निवडीची प्रकिया पार पडणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार पत्र पाठवणार आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांची निवडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सध्याची कोरोनाची परिस्थिती, शेतकरी प्रश्न यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी असे सुधिर मुनगंटीवार म्हणाले. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही आग्रह धरला की, अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे. मात्र, त्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. येत्या 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
 
आमचे 12 आमदार निलंबित आहे. निलंबीत केल्यामुळे ते मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत. कोर्टाचा आदेश आहे की, तुम्ही मातदात्यांना वंचित ठेऊ शकत नाही. परंतू, तरीदेखील मतदान होणार आहे. अध्यक्ष निवडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सुधिर मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. अद्याप एसटी (ST)कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. आम्हाला या मुद्यांवर चर्चा करायची आहे. त्यामुळे कालावधी वाढवण्याचा आग्रह धरत असल्याचे पाटील म्हणाले. तर राज्य सरकार हे लोकशाहीचे रक्षक असतील तर कालावधी वाढवतील, भक्षक असतील तर थांबवतील असा टोला यावेळी भाजपचे नेते सुधीर  मुनगंटीवार यांनी लगावला.

महत्तवाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Devendra Fadnavis and PM Modi: दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget