एक्स्प्लोर

Eknath Shinde Pune : सल्ल्याची गरज असली की मी शरद पवारांना फोन करतो; एकनाथ शिंदेकडून पवारांचं कौतुक

मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 वी सर्वसाधारण सभेत बोलत होते.

Eknath Shinde Pune : "मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात," असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. ते पुण्यातील (Pune) मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) 46 व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी  शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित होते. 

गरज असेल तेव्हा शरद पवार मला फोन करुन सूचना करतात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना उल्लेख केला आहे. गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचं, मीही गोड गोड बोलणार. मी नुकतंच दाओसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणलेली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा फोन करतात तेव्हा सूचना करतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही," अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

'साखर उद्योगाला शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाची गरज'

वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो. आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा मोठा हातभार लागतो. साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही अभिमानाची बाब आहे. साखर उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे. असंख्य शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत म्हणूनच अठरा प्रकल्प राबवत आहोत. या क्षेत्रास शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी माणसाची गरज आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठिशी, सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत : मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच इथेनॉल वापराला प्राधान्य देत आले आहेत. याचा साखर कारखानदारांना फायदा होईल. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. तेच शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत. त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजे. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवारांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दल त्यांना आत्मियता आहे, त्यांचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी नेहमी मार्गदर्शन करावं. याचा राज्याला नक्कीच फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना भेटून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी मदत करावी अशी मागणी करतो. त्यांनीही आतापर्यंत चांगली मदत केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget