Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे (Eknath shinde ) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच गोव्यातील हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. आमदारांनी हॉटेलमधील टेबलवर चढून डान्स केला. आमदारांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह भाजपशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. अखेर काल उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. ही बातमी गोव्यातील शिंदे समर्थक आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि आमदारांनी एकच जल्लोष केला. यावेळी काही आमदारांनी चक्क हॉटेलमधील टेबलवर चढून जोरदार डान्स केला.
व्हिडीओ व्हायरल
गोव्यातील हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदारांनी डान्स केल्यानंतर त्यांच्या डान्सचा व्हीडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडोओ आपल्या व्हट्सअॅप स्टेटसला देखील ठेवला आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. आमदारांच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार टेबलवर चढून डान्स करत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या