Ichalkaranji municipal corporation : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकपदी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. इचलकरंजी ही राज्यातील 28 वी महानगरपालिका आहे. 


इचलकरंजी नगरपालिकेचे (Ichalkaranji municipal corporation) रुपांतर महापालिकेत झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी आहे. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळेच इचलकरंजी ही महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या या पाठपुराव्याला यश आले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.


इचलकरंजी (Ichalkaranji)हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. या शहरावर राजकीय वर्चस्व असावं अशी इच्छा प्रत्येक पक्षाची आहे. त्यामुळेच सर्वच पक्षाकडून यासाठी प्रयत्न केले जातात. या शहराची लोकसंख्याही मोठी आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा मुद्दा होता, सर्वांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही या मुद्द्याचा समावेश होता. 


या शहरात नगरपालिका असून त्याचे रुपांतर महापालिकेत करण्यात यावेत यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रयत्नांना यश आले असून या नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. राज्यात या आधी 27 महापालिका होत्या. आता इचलकरंजीच्या रुपात 28 व्या महापालिकेची भर यात पडणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या