नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना आमने सामने पाहायला मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या प्रत्येक भाषणातून एकमेकांवर टीकेचे बाण सोडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, रविवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "शिवसेनेसाठी 100 हून अधिक केसेस छातीवर घेतल्याने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो" असल्याचे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 


रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांना पुन्हा एकदा रामटेक मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. तर, यावेळीच्या लढाईचा पहिला टप्पा आपण यशस्वी केला असून, आता मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना विजयी करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. याच रामटेक मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीवेळी आपण स्वतः मेहनत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला होता. घरी बसून पक्ष चालत नसून त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते. शिवसेनेसाठी 100 हून अधिक केसेस छातीवर घेतल्या म्हणून आज मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो असे, शिंदे म्हणाले. 


झेंडा आणि अजेंडा नसलेली लोकं मोदींना आव्हान देतायत...


पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे जागतिक पटलावर देशाचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. देशाचा सर्वांगीण विकास करून विकसित भारत बनवणे हा त्यांचा अजेंडा आहे. तर, दुसरीकडे झेंडा आणि अजेंडा दोन्ही नसलेली लोकं त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत. मात्र, आगामी निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन शिंदेंनी केले. तसेच अब की बार चारसो पार हा नारा यशस्वी करून दाखवण्यासाठी मोठ्या जोमाने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले. 


कृपाल तुमाने शिंदेंसमोरच भाजपवर सोडले बाण...


मुख्यमंत्री शिंदे यांनी अब की बार चारसो पार हा नारा यशस्वी करून मोदीजींचे हात बळकट करण्याचे आवाहन रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्यात केले. पण याच मेळाव्यात शिंदेसेनेचे नेते कृपाल तुमाने य्णाई थेट भाजपवर निशाणा साधला आहे. "मागील लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसचे केंद्रीय नेते असलेल्या मुकुल वासनिक यांचा पराभव केला आलो होतो. या निवडणुकीत तर आपल्या विरोधात स्पर्धकचं नव्हता, पण साहेबांवर दबाव होता. त्यामुळे मी माघार घेतली असल्याचे" तुमाने म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Palghar Lok Sabha : पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना, माञ प्रचार सुरु; कमळावर लढणार गावीत?