Eknath Khadse : सत्तधारी शिवसेना पक्षाचे आमदार किशोर आप्पा पाटीला यांनीच सरकारवर टीका केली आहे. मला या सरकारने यावर्षी एक रुपयाची कवडीचीही मदत केली नाही असं ते म्हणालेत. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या आमदारांची ही परिस्थिती असेल तर विरोधकांचे काय हाल होत असतील? असा सवाल एकनाथ खडसेंनी केवला आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
दिवाळखोर सरकारमधीलच एक आमदार सरकारवर टीका करत आहे
या दिवाळखोर सरकारमधीलच एक आमदार सरकारवर टीका करत असेल तर महायुतीत सर्वकाही अलबेल आहे असं नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. संजय राऊत हे आजारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः फोनवर बोललो आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. संजय राऊत यांनी मला सांगितलं की मी ठणठणीत बरा होऊन लवकरच जनतेच्या सेवेत येणार आहे. त्यांची वील पॉवर स्ट्रॉंग आहे, त्यामुळं मी लवकर बरा होऊन येईल असं त्यांनी मला म्हटलं आहे. माझ्या शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना आहे तुमची प्रकृती चांगली होवो असे एकनाथ खडसे म्हणाले.
काहीतरी काळ बेरं आहे, भाजपवर टीका
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढला आहे. राज ठाकरे यांनी मतदार यादीत किती मोठा घोड आहे हे पुराव्यानिशी आपल्या सभेत दाखवलं आहे. भाजपने यासंदर्भात उत्तर देण्याची गरज नाही कारण निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. मात्र भाजप उत्तर देत आहे. त्यामुळं यात काहीतरी काळ बेरं आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
नेमकं काय म्हणाले किशोर पाटील?
पाचोरा येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही,” असे देखील किशोर पाटील यांनी म्हटले.