Aaditya Thackeray : जे सत्त्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यावर गुन्हे दाखल होणार हे माहित होतं, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. सत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. माझ्या मतदारसंघात 113 मतदार असे आहेत जे चुकीचे आहेत. कितीतरी कोटी मतदार आहेत जे बोगस आहेत. वोट चोरी करुन हे डोक्यावर बसले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांनी आरशात स्वतःचे चेहरे पाहावे
आमच्या कुटुंबाच्या बाबतीत जे झालं त्याबद्दल आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. हे इतरांसोबत झालं तर नेमकं काय होईल? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री काल आले असते तर आम्हाला आवडलं असतं. जे आमदार पळून गेले किंवा ज्यांना वाटलं सगळ्यांना मिळेल पण आता सत्य समोर यायला लागलं आहे. पण ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांनी आता स्वतःचे चेहरे पाहावे आरशात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर केली.
मतचोरीच्या विरोधात मोर्चा! आयोजकांवर गुन्हा दाखल होणार
मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात काल (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात काल मोर्चा काढला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्यावही माहिती मिळाली आहे. कारण, परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार आहे. आझाद मैदान पोलीस ठाणे आणि झोन 2 मध्ये डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.
राज ठाकरेंनी वाचला दुबार मतदारांचा पाढा
जुलै 2025 च्या तारखेनुसार उत्तर मुंबईत 1739456 यातील 62370 दुबार मतदार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती दिली. मुंबई उत्तर पश्चिम 60231,मुंबई उत्तर पूर्व मध्ये 92983 दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्ये 63740 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात 50565, दक्षिण मुंबईत 55205, नाशिक लोकसभा मतदारसंघात 99673 दुबार आणि मावळ 145636 दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणत राज ठाकरेंनी कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. राज ठाकरे यांनी याला निवडणुका म्हणतात का? असा सवाल केला. यातून लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या: