Eknath Khadse on Bjp : शरद पवार यांच्यासारखा धुरंदर आणि चाणक्य निती असलेला नेता आपल्याकडे आहे. त्यामुळं आगामी काळात महाविकास आघाडी ताकदीनं एकत्र लढली तर भाजपचा धुव्वा झाल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. धनुष्यबाण मोडल्यानं मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याचेही खडसे म्हणाले. बोदवड  इथं आयोजीत करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना खडसेंनी भाजपला इशारा दिला.


दोघांच्या भांडणात शिवसेनेचा धनुष्यबाण मोडला


उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्या भांडणामुळं शिवसेनेचा धनुष्यबाण मोडला आणि बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई भंग पावली. यामुळं आपला मित्रपक्ष असलेला शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. भाजप विरोधात लढा देण्यासाठी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष मजबूत असले पाहिजे. तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार येऊ शकतं, हे शरद पवार यांनी दाखवून दिलं असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. आपल्या मित्रपक्षाचा धनुष्यबाण गेल्यामुळं आपल्याला त्याचं वाईट वाटतं. शेवटी मित्रपक्ष मजबूत असला तर आपण मजबूत असतो. भाजपशी लढायचा असेल तर तिघांनी एकत्र यावं लागले. तिन पक्ष मिळून सरकार येऊ शकते हे पवारसाहेबांनी करुन दाखवलं असेही खडसे यावेळी म्हणाले. 


...तर आपला मुख्यमंत्री झाला असता


आपल्या पक्षाला भवितव्य आहे. राज्यात आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत. महाविकास आघाडी एकत्र लढलो तर पुन्हा आपणच सत्तेत येऊ असा विश्वास खडसेंनी व्यक्त केला. आपल्याकडे आणखी दोन तीन आमदार असते तर मुख्यमंत्री आपला झाला पाहिजे. त्यामुळं आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. यासाठी पक्षाने केलेल्या सुचनांचे पालन केले पाहिजे असेही खडसे यावेळी म्हणाले.


घोडा मैदान दूर नाही


शरद पवार यांच्यासारख्या चमत्कार करणारा नेता, धुरंदर नेता आपल्याकडे आहे. त्यामुळं आगामी काळात आपलीच सत्ता येईल. घोडा मैदान दूर नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपसोबत इतर पक्षांचा देखील धुव्वा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी विरोधकांना दिला. तीन ते चार आमदार कमी असल्यानं गेल्या काळात आपला मुख्यमंत्री होऊ शकला नाही, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. आगामी काळात आपल्या मित्रपक्ष शिवसेनेची ताकद कमी झाली असली तरी आपण मात्र एक नंबरचा पक्ष झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे एकनाथ खडसे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी शरद पवार-आशिष शेलार यांचं संयुक्त पॅनल, संदीप पाटील स्वतंत्र मैदानात उतरणार