एक्स्प्लोर

पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट

मुंबई : कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी एसीबीने माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे.  एसीबीनं मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचे नाव नाही.   त्यामुळे या प्रकरणातून एकनाथ खडसे निर्दोष सुटण्याची चिन्हं आहेत. पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट गजानन पाटील याला ज्या ठिकाणांवरुन एसीबीने ताब्यात घेतले होते, ते ठिकाण म्हणजे खडसेंचे मंत्रालयातील दालन याचाही उल्लेख नसून, मंत्रालय असा उल्लेख आरोपपत्रात आहे. हे आरोपपत्र १ हजार पेक्षा जास्त पानांचे असून, फक्त गजानन पाटील यालाच फक्त आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली असं स्पष्ट होतं.   दरम्यान, एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर खडसेंनी आनंद व्यक्त केला आहे.  आरोप करण्यापूर्वी एकानेही पुरावा दिलेला नव्हता. मी प्रत्येकाला पुरावा देण्याचं आवाहन करत होतो. मात्र कोणीही पुरावे देऊ शकले नाहीत. पण मी नैतिकतेतून राजीनामा दिला. माझी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोप करणाऱ्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया खडसेंनी एबीपी माझाकडे दिली.  

संबंधित बातमी - गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

  यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र खडसेंना पुराव्यानिशी भ्रष्ट सिद्ध करु असं ठणकावून सांगितलं. काळबेरं असल्याशिवाय आरोप होत नाहीत. त्यामुळे खडसेंवरील आरोप कागदोपत्री सिद्ध करुन दाखवू, असं दमानिया म्हणाल्या.   याला उत्तर देताना खडसे म्हणाले, "दमानियांनी मी घाबरत नाही. हिम्मत असेल तर कोर्टात जा. तिथे पुरावे द्या, न्यायव्यवस्था सर्व काही पाहून घेईल. राज्यभरात आमचे कार्यकर्ते विविध कोर्टात आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहेत" असं खडसे म्हणाले.   काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण? राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी 14 मे रोजी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली. ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.   लोकायुक्तांकडूनही क्लीन चीट लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीनं गजानन पाटलाला मंत्रालयाबाहेर रंगेहात अटक केली होती. या लाचखोरी प्रकरणी तक्रारदार रमेश जाधवांनी एकनाथ खडसेंविरोधात लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यातील संभाषणाच्या 12 रेकॉर्डिंग तपासल्या. मात्र ती 30 कोटींची लाच एकनाथ खडसेंद्वारे मागितल्याचं कुठंच सिद्ध होत नसल्यामुळं लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली होती.

संबंधित बातम्या

30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक

जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे

खडसे, महाजनांवरील आरोप खोटे : मुख्यमंत्री

अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
EPFO : पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार? नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे UPI द्वारे कधीपासून काढता येणार? EPFO ची 3.0 प्रणाली कधी पासून सुरु होणार?
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
Embed widget