एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु, काँग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीत चिंता

विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी केला संपर्क असल्याची सूत्रांची माहिती आहे. उमेदवार कसा निवडून आणायचा यावर चर्चा होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे सहा उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे दोन आहेत. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. सहा उमेदवार निवडून कसे आणायचे याचे नियोजन सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण,नितीन राऊत आणि सतेज पाटील यांच्यात आज बैठक झाली असून सहाव्या जागेबाबत काँग्रेस अजूनही ठाम असल्याची माहिती आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेस चर्चा करणार आहे, अशी देखील माहिती आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक  विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून येणे महत्वाचे असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार हे अजून निश्चित व्हायचं आहे. मात्र प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 27 मे च्या आधी निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक महत्वाची आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या 6 जागा निवडून येऊ शकतात, असा विश्वास काँग्रेसला वाटतो. कसं आहे आकड्यांचं गणित या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे. MLC Election | विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार नावं निश्चित, दिग्गजांचा पत्ता कट महाविकास आघाडीला 174 मतांची गरज महाविकास आघाडीने 6 जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर 29 मतांच्या कोट्यानुसार त्यांना 174 मतांची गरज आहे. म्हणजेच सहावी जागा निवडून आणायला महाविकास आघाडीला तीन मतं कमी पडतात. जे लहान पक्ष तटस्थ आहेत त्यांची मतं मिळवून सहावी जागा जिंकता येईल असा काँग्रेसचा दावा आहे. विधानसभेत तीन पक्ष तटस्थ असून त्यांच्याकडे 4 आमदार आहेत. यात एमआयएम 2, मनसे 1 आणि सीपीएम यांच्या एका आमदाराचा समावेश आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज संघर्ष मोर्चा
Maharashtra Live News Updates: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज संघर्ष मोर्चा
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत
धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Eknath Shinde Thane Fire: ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Embed widget