मुंबई : यावर्षी कोरोनाचा राज्यात वाढलेला प्रादुर्भाव पाहता दहावी बोर्ड परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी नेमके काय निकष असावे ? याबाबत शिक्षण विभागाचे विचार विनिमय सुरू असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी का ? याबाबत विद्यार्थ्यांकडून मत जाणून त्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना याबाबत आपले स्पष्ट मत शिक्षण विभागाने दिलेल्या लिंक वर जाऊन या प्रकारची परीक्षा हवी की नाही ? याबाबतचे मत मांडायचे आहे


परीक्षेबाबत विचार करताना प्रस्तावित सीईटी परीक्षा OMR (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) पद्धतीने घेतली जाणार आहे. सदर परीक्षा ही सर्व विषयांची मिळून 100 गुणांची असेल व त्यासाठी एकच पेपर असणार. या सीईटी परीक्षेचा कालावधी ठरवताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे 2 तासांचावेळ दिला जावा, अशाप्रकारचे नियोजन शिक्षण विभागाकडून विचारात आहे. या सर्वेक्षण  लिंकमध्ये विद्यार्थ्यांने आपले नाव, शाळा, बोर्ड याबाबत माहिती भरून सीईटी परीक्षा घ्यावी की नाही ? याबाबत आपले मत स्पष्ट करायचे आहे. त्यानुसार शिक्षण विभाग प्रस्तावित परीक्षेबाबत विचार करायचा की इतर कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा हे लवकरच ठरवेल. 


दहावी विद्यार्थ्यांसाठीची अकरावी प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने जुलै महिन्यात किंवा राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घेण्याचे नियोजन असल्याच शिक्षण विभागकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शिक्षण विभाग दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नसल्याने अंतर्गत मूल्यमापणासाठी नेमके काय निकष अवलंबावे याबाबत विचार विनिमय करत आहे. विविध शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर सुद्धा लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.


 


संबंधित बातम्या