मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी या वेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत परीक्षेच्या बातमीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.  


दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार आहे. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. 


राजेश टोपे म्हणाले, ऑक्सिजन हा कळीचा मुद्दा आहे.  अनेक ठिकाणी ऑक्सिजन निर्माण करणारे थर्मल पॉवर स्टेशन आहेत. परंतु ते थेट रुग्णांना देत नाही. रुग्णांना ते देण्यासाठी लिक्विज फॉर्ममध्ये  बॉटलिंग करणे आवश्यक असते. त्यामुळे बॉयलिंग प्लांट लवकरात लवकर टाकायचे असे महाराष्ट्रात सहा ठिकाणे आहे. या सहा ठिकाणांवर त्वरीत टाकण्यात येणार आहे.



लसीकरण मोहिम वेगाने राबविणार : टोपे


महाविकासआघाडीने लसीकरणाची राज्यात लसीकरणाची मोहिम जोरदार राबवण्यात येणार आहे. लसीकरणासाठी इतर सर्व खर्चात कपात करू परंतु राज्यात लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे. लसीकरणाची मोहिम राबवण्यासाठी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींबरोबरच परदेशातून इतर लसी घेतल्या पाहिजे आणि लसीकरण वेगाने केले पाहिजे. 18 ते 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाची मोहिम वेगाने राबवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितले